शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

मॉस्क न वापरल्यास आता दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मॉस्क वापरणे अनिवार्य राहील. सदर व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याचे आढळून आल्यास त्यास दोनशे रुपये दंड आकारण्यात येईल आणि तीन मॉस्क देण्यात येणार आहे. दंडाची रक्कम शासकीय तिजोरीत जमा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशेल्टर होममधील मजुरांना देणार रोजगार : जिल्ह्यातील सिमेंट उद्योगाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन वेळोवेळी सूचना व आदेश देत आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचना, नियमांचे काटेकोर पालन करावे. अन्यथा कारवाई करण्यात येईल. आता सार्वजनिक ठिकाणी वावरताना मॉस्क वापरणे बंधनकारक आहे. अन्यथा दोनशे रुपये दंड आकारला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला आहे.सोमवारी या संदर्भात जिल्ह्यातील नागरिकांना व्हिडीओ संदेश देताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना आजाराचा शिरकाव होऊ नये, यासाठी अतिशय मर्यादित स्वरूपात तपासणी करून काही उद्योगांना सुरुवात करण्यात येत असल्याचे सांगितले. आजूबाजूला दोन जिल्हे कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे चंद्रपूरमध्ये येणाऱ्या नव्या कोणत्याही प्रवासाची तपासणी अनिवार्य आहे. अशा व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश दिले आहे. जिल्ह्यात मर्यादित स्वरूपात मात्र केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करीत सिमेंट उद्योगाच्या काही कारखान्यांना सुरुवात करण्याची परवानगी दिली आहे.सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मॉस्क वापरणे अनिवार्य राहील. सदर व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याचे आढळून आल्यास त्यास दोनशे रुपये दंड आकारण्यात येईल आणि तीन मॉस्क देण्यात येणार आहे. दंडाची रक्कम शासकीय तिजोरीत जमा करण्यात येणार आहे.सध्या जिल्ह्यामध्ये मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड आदी विविध भागातील मजूर मोठया प्रमाणात शेल्टर होममध्ये थांबले आहे. या सर्वांना आपल्या घराकडे जाण्याची ओढ आहे. मात्र पुढील ३ मेपर्यंत शासनाने आंतर जिल्हा, आंतरराज्य, जाणे-येणे बंद केलेले आहे. त्यामुळे या मजुरांना राहणे व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.परंतु, या काळातदेखील त्यांना रोजगार मिळावा म्हणून स्थानिक ठिकाणी आवश्यक ते सामाजिक अंतर व सुरक्षितता पाळून काम देण्याचा प्रस्ताव शासनाने त्यांच्या पुढे ठेवला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये शासनाच्या शेल्टर होममध्ये ७९४ विविध बांधकाम ठेकेदाराकडे सहा हजार ३८६, गोसेखुर्दसारख्या मोठया प्रकल्पावर १२०३ अशा एकूण ८३८३ मजुरांची संख्या आहे. त्या ठिकाणी रोजगार देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.यांना करता येईल कारवाईउपरोक्त आदेशातील दंडात्मक व फौजदारी कारवाई पोलीस विभाग, संबधित महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत प्रशासनाला करता येणार आहे. तसेच दंड केलेल्या व्यक्तीस दंडाची कारवाई करणाऱ्या विभागाने तीन मॉस्क दयावे, असे स्पष्ट केले आहे. नियमांचे पालन न करणाºया नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील १९३ प्रकरणात एकूण ११ लाख ३७ हजार ९७० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या ५८ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर ७०१ वाहने जप्त केली आहेत. प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.सोशल डिस्टंन्सिंग पाळासार्वजनिक ठिकाणे, कामाची ठिकाणे, वाहतुकीच्या ठिकाणांचे प्रभारी यांनी त्याठिकाणी सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टन्सिंग)े पालन होईल, याबाबत दक्षता घ्यावी. तसेच भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यानी दिल्या आहेत.गुटखा विक्री करणाºयांवर कारवाईसार्वजनिक ठिकाणी कोणत्याही संघटनेने, व्यवस्थापकाने दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्याच्या परवानगीला मज्जाव असून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, गुटखा, तंबाखु यांची विक्री करणाºयावर सक्त कारवाईचे निर्देश दिले आहेत. उपरोक्त आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुध्द दंडात्मक आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ४३ आणि भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८,२६९, २७०, २७१ नुसार कारवाई करण्यात येईल.

कोटा येथील मुलांच्या परतीसाठी प्रयत्नराजस्थान येथील कोटा या शहरात विविध अभ्यासक्रमासाठी गेलेल्या चंद्रपूर येथील मुलांना परत आणण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे अनेक लोकांनी विनंती केली आहे. जिल्हा प्रशासन या मुलांना परत आणण्याबाबत राज्य शासनाकडून परवानगी घेत आहे. यासंदर्भात अनेक मुलांसोबत जिल्हा प्रशासनाकडूनही संपर्क झालेला आहे. तथापि, कोटा येथून मुलांना परत आणताना चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मुलांना एकत्रित आणता यावे, यासाठी सर्व मुलांची यादी गोळा करणे सुरू आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या