शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात हाजीला चंद्रपूर कारागृहाने नाकारले

By admin | Updated: May 11, 2015 01:05 IST

विविध गुन्ह्यांत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेला कुख्यात गुंड हाजी सरवर याला शनिवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली;

रूपेश कोकावार चंद्रपूर (बाबूपेठ)विविध गुन्ह्यांत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेला कुख्यात गुंड हाजी सरवर याला शनिवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली; मात्र चंद्रपूर येथील कारागृह प्रशासनाने त्याला ठेवण्यास चक्क नकार दिला. त्यामुळे नाईलाजाने पोलिसांनी रविवारी १० वाजता चोख बंदोबस्तात हाजीला नागपूर येथील कारागृहात हलविलेकारागृह प्रशासनाच्या या भूमिकेमुळे पोलिसांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. हाजी सरवरच्या गुन्हेगारीची पार्श्वभूमी लक्षात घेता, त्याला नागपूरला नेत असताना काही विपरीत घडले असते तर, त्याची जबाबदारी कुणी स्वीकारली असती, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. मंगळवारी ५ मे रोजी हाजीला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयाने ९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला २२ मेपर्यंत चंद्रपूरच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश बजावले. हा आदेश मिळताच, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर टिक्कस व त्यांच्या पथकातील सदस्य हाजी सरवरला चंद्रपूरच्या कारागृहात घेऊन गेले. मात्र नागपूरच्या कारागृहातून काही खतरनाक गुंड पळून गेल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणावरून चंद्रपूर कारागृहाचे अधीक्षक ए.के. जाधव यांनी हाजीला कारागृहात ठेवण्यास थेट नकार दिला. यावेळी पोलिसांनी जाधव यांना एका रात्रीपुरते तरी हाजीला येथे ठेवा, अशी विनवणी केली. मात्र जाधव यांनी पोलिसांचे काहीएक ऐकले नाही. अखेर नाईलाज झाल्याने पोलिसांना त्याच रात्री हाजीला बंदोबस्तात नागपूर येथील कारागृहात घेऊन जावे लागले. पोलीस गुंडाला अटक करतात. परंतु कारागृह प्रशासन कोणतीही मदत करीत नसल्याने पोलीस यंत्रणेतही नाराजी व्यक्त केली जात आहे.खतरनाक गुंड कारागृहात चंद्रपूरच्या कारागृहात यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे असलेल्या खतरनाक गुंडांना ठेवण्यात आले आहे. सध्याही येथे काही गुन्हेगार असल्याची माहिती आहे. काही नक्षलवादीही या कारागृहात ठेवण्यात आल्याचा इतिहास आहे. असे असताना हाजीला या कारागृहात न ठेवण्यामागचा उद्देश काय, असा प्रश्न आहे. हा तर जबाबदारी झटकण्याचा प्रकारगुंड हादेखील शेवटी माणूसच असतो. कारागृहात दाखल झाल्यानंतर दक्ष राहून गुन्हेगाराच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवणे, ही कारागृहाची जबाबदारी असते. मात्र अलिकडील काळात कारागृहातही बोकाळलेल्या गैरप्रकारामुळे गुंड कारागृह प्रशासनावर वरचढ होत आहेत, असेच कारागृह अधीक्षकांना सुचवायचे होते काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.