शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ना मदत, ना तपासणी, त्यांचा उघड्यावर संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:27 IST

बामणीत मुक्कामाने असलेल्या १५ कुटुंबाची उपासमार मंगल जीवने बल्लारपूर : कोरोना काळात संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अनेक प्रकारच्या उपाययोजना करत ...

बामणीत मुक्कामाने असलेल्या १५ कुटुंबाची उपासमार

मंगल जीवने

बल्लारपूर : कोरोना काळात संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अनेक प्रकारच्या उपाययोजना करत आहे. गरजूंना अन्नधान्याची मदत, स्वस्त मोफत धान्याची मदत, वॅक्सिनची सोय, परंतु भटक्या नागरिकांकडे कोणाचेही लक्ष नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.

ही व्यथा आहे, बामणी येथे सोमाणी काॅम्प्लेक्सच्या समोरील मैदानात कोरोना काळात वास्तव्य असलेल्या १५ भटक्या कुटुंबाची. ते आपल्या छोट्या मुलाबाळांसह मागील दीड वर्षांपासून कुटुंब घेऊन वास्तव्यास आहेत व कोरोना संसर्ग संपायची वाट पाहत आहेत. ना कोणाची मदत, ना प्रशासनाकडून कोरोना तपासणी, ना लस घेण्याची चिंता, ना मास्क ना सामाजिक अंतर, असे या कुटुंबाचे उघड्यावर आपल्या कुटुंबीयांसोबत बिनधास्त वास्तव्य आहे. प्रशासनाच्या पथकातील गाड्या दिवसभर इकडून तिकडे फिरत असतात; परंतु त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. कोरोना संकटात या कुटुंबापर्यंत अजून तरी ग्रामपंचायत बामणी किंवा तहसील प्रशासनाची मदत पोहोचली नाही किंवा विचारणा केलेली नाही.

एका कुटुंबाबातील इसमाने सांगितले की, मागच्या वर्षी आम्ही इथे आलो व कोरोना संसर्ग सुरू झाल्यामुळे आम्हाला इथेच थांबावे लागले. या काळात मात्र आम्हाला अनेकांनी जीवनावश्यक वस्तू देऊन सहकार्य केले; परंतु यावेळेस मात्र आम्हाला दारोदारी भटकून उदरनिर्वाह करावा लागत आहे. आमच्याकडे स्वस्त धान्याचे रेशनकार्ड नाही. यामुळे सरकारचे मोफत धान्यही आम्हाला मिळत नाही. कुटुंबाचे पोषण कसे करावे याचा आम्हाला विचार पडला आहे.

कोट

बामणेत कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आहे. अशावेळी बामणीत येऊन ग्रामपंचायतला न विचारता १५ कुटुंबांसह थांबण्याची माहिती ग्रामपंचायतीला देणे गरजेचे होते; परंतु तशी परवानगी या लोकांनी घेतली नाही. याची माहिती आम्ही तहसीलदार यांना देणार आहे.

-सुभाष ताजने, सरपंच, ग्रामपंचायत,बामणी.