नवे पोलीस अधीक्षक रूजू

By Admin | Updated: May 17, 2015 01:32 IST2015-05-17T01:32:53+5:302015-05-17T01:32:53+5:30

जिल्ह्याचे नवे पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांनी शनिवारी दुपारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली.

New Superintendent of Police Ruuju | नवे पोलीस अधीक्षक रूजू

नवे पोलीस अधीक्षक रूजू

चंद्रपूर : जिल्ह्याचे नवे पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांनी शनिवारी दुपारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली.
येथील जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांचे स्थानांतरण झाल्याने त्यांच्या रिक्त पदावर संदीप दिवाण नाशिकवरून आले आहेत. शनिवारी सकाळी ते चंद्रपूरला पोहचले. त्यानंतर दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास त्यांनी राजीव जैन यांच्याकडून पदभार स्विकारला. त्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव यांच्यासह त्यांनी संपूर्ण कार्यालयात आणि कार्यालयाच्या परिसरात फेरफटका मारून अवलोकन केले.
दरम्यान, नवे जिल्हा पोलीस अधिकारी संदीप दिवाण यांचे कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छाने स्वागत केले. तर, राजीव जैन यांनाही कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला.
सायंकाळी जिल्हा पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या समारंभात स्थानांतरण होऊन नागपूरला जात असलेले लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक राजीव जैन यांना निरोप देण्यात आला. तर, नवे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अधिकारी, पोलीस शिपाई मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: New Superintendent of Police Ruuju