महागाईच्या काळात सामूहिक विवाह सोहळे काळाजी गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:00 AM2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:17+5:30

मुस्लिम एज्युकेशन (ईसीएआरटीएस) च्या वतीने सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजीक कार्यकर्त्या शाहीन शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, जिल्हा परिषदेचे माझी समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, वरोरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष एहतेशाम अली आदींची मंचावर उपस्थिती होती.

The need for collective marriages during times of inflation | महागाईच्या काळात सामूहिक विवाह सोहळे काळाजी गरज

महागाईच्या काळात सामूहिक विवाह सोहळे काळाजी गरज

googlenewsNext
ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : मुस्लिम समाजातील २१ जोडपी विवाहबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विवाह सोहळ्यासारख्या पवित्र बंधनालाही महागाईचा फटका बसला आहे. एकीकडे बेरोजगारी तर दुसरीकडे महागाई या दुहेरी पेचात अडकलेल्याना विवाह सोहळ्याचा खर्च आर्थिक संकटात टाकणारा आहे. यावर उपाय म्हणून गरिब, गरजूंनी सामूहिक विवाह सोहळ्याकडे पर्याय म्हणून पाहण्याची गरज असून असे आयोजन आता काळाजी गरज बनली असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
मुस्लिम एज्युकेशन (ईसीएआरटीएस) च्या वतीने सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजीक कार्यकर्त्या शाहीन शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, जिल्हा परिषदेचे माझी समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, वरोरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष एहतेशाम अली आदींची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले, काळाची गरज ओळखून तुकडोजी महाराजांनी सामूहिक विवाह सोहळयाची संकल्पना ग्रामगीतेतून मांडली होती. त्यांच्या या संकल्पनेला एकरुप होऊन असे आयोजन करण्याची गरज आहे. खरे तर, अनेक सेवाभावी संस्थांकडून सामूहिक विवाह सोहळयांचे आयोजन केल्या जात आहे. मात्र यात विवाहबध्द होणाऱ्या जोडप्यांची संख्या कमी असते. त्यामुळे समाजानेही आता कोणताही संकोच मनात न बाळगत अशा आयोजनात सहभाग घेतला पाहिजे, असेही जोरगेवार म्हणाले.

मुस्लीम महिलांचेही सामाजिक कार्यात योगदान- शाहीन शेख
मुस्लिम समाजाच्या महिला आता सामाजिक क्षेत्रात समोर येत आहे. महिलांनी समाजाच्या महिलांचा संसार थाठण्यासाठी केलेले सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन हे ऐतिहासिक असून पुढे संस्थेच्या वतीने असे आयोजन केल्या जाणार असल्याचे प्रतिपादन मुस्लिम एज्युकेशन (ईसीएआरटीएस) च्या अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या शाहीन शेख यांनी केले. या संस्थेत महिला कार्यरत असून हे या संस्थेचे दुसरे आयोजन आहे. मागच्या वर्षी झालेल्या सामूहि क विवाह सोहळयात समाजाच्या ११ जोडप्यांचा विवाह संस्थेच्या वतीने विवाह करण्यात आला होता. यंदा २१ नवे जोडपी विवाह बंधनात बांधल्या गेली आहे, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: The need for collective marriages during times of inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.