शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:19 IST

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करुन सोमवारी (दि.२७) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देविविध मागण्या : जिल्हाधिकाºयांना निवेदन

आॅनलाईन लोकमतगोंदिया : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करुन सोमवारी (दि.२७) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात विविध मागण्यांचा समावेश होता.केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेसतर्फे राज्यभर हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे. याच अर्तर्गत सोमवारी गोंदिया येथे हे आंदोलन करण्यात आले. शेतकरी कर्जमाफी, महागाई, बेरोजगारी, वीज दरवाढ, पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ, ओबीसी शिष्यवृत्ती, रस्ते दुरूस्ती व विस्कळीत झालेली न्यायव्यवस्था, भाजप सरकारने दिलेले खोटे आश्वासन व या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी हे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यापुढे १ ते ११ डिसेंबरपर्यंत यवतमाळ ते नागपूर १५३ किलोमीटरची हल्लाबोल पदयात्रा काढून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादी पक्षाने म्हटले आहे. जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यात जि.प.चे गटनेते गंगाधर परशुरामकर, जिल्हा उपाध्यक्ष शिव शर्मा, पंचम बिसेन, जि.प. सदस्य कुंदन कटारे, दुर्गा तिराले, सुमन बिसेन, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, रजनी गौतम, कैलाश पटले, सुरेश हर्षे, किशोर तरोणे, मनोहर चंद्रिकापुरे, महेश जैन, अविनाश काशिवार, प्रेमकुमार रहांगडाले, तुकाराम बोहरे, केवल बघेले, प्रभाकर दोनोडे, लोकपाल गहाणे, नामदेव डोंगरवार, रफीक खान, विनोद पटले, मोहन पटले, आशा पाटील आदी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.