शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवर निसर्गाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

राजुरा तालुक्यात खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी पिकांवर परतीच्या पावसाने घाला घातला. उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेती केली होती. यावर्षी चांगले उत्पादन घेऊन शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडू, अशी आस प्रारंभी शेतकऱ्यांना होती. पैशाची कशीबशी जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी मोठया कष्टाने शेती केली.

ठळक मुद्देशेतकरी कर्जाच्या बोझ्याखाली : पावसाने कापूस, सोयाबीन, धान शेती भुईसपाट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : परतीच्या व अवेळी आलेल्या पावसामुळे खरिपातील कापूस, सोयाबीन, धान पिकाला मोठा फटका बसला आहे. नोव्हेंबर महिना म्हणजे पीक हाती येण्याची वेळ. मात्र हाती येणारे पीक पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत हिरावल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. शासनाच्या वतीने सर्व्हेक्षण सुरु करण्यात येणार आहे. मात्र यापूर्वीचा अनुभव बघता प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळेल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.राजुरा तालुक्यात खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी पिकांवर परतीच्या पावसाने घाला घातला. उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेती केली होती. यावर्षी चांगले उत्पादन घेऊन शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडू, अशी आस प्रारंभी शेतकऱ्यांना होती. पैशाची कशीबशी जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी मोठया कष्टाने शेती केली. पुन्हा नवे स्वप्न डोळ्यात साठवून शेतकरी दिवसरात्र शेतात राबू लागले. यावर्षी तरी चांगले उत्पादन होऊन घरी सुबत्ता येईल, असे शेतकऱ्यांना वाटत असतानाच परतीच्या पावसाने एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. कापूस पिकाला चांगली बोंडे आली होती. तर सोयाबीन पीक काही शेतकऱ्यांनी कापून शेतात कडपा करून ठेवला होता. सारे काही व्यवस्थित सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाने कापून ठेवलेले बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पावसाच्या तडाख्यात सापडले. इकडे दिवाळी साजरी करण्याची लगबग असतानाच पावसाने डाव साधला. आणि कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी पीक पावसाच्या कचाट्यात सापडले. सोयाबीन पीक तर शेतकऱ्यांनी कापून ठेवले होते. परंतु आलेल्या पावसाने सोयाबीन पिकाची पार वाट लावून टाकली.कापूस व धान पीक पावसाने पूर्णत: आडवे पाडले. परतीच्या पावसाने डोळ्यादेखत पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकºयांवर संकटांचा डोंगर कोसळला आहे. सोयाबीन पिकाला मोठया प्रमाणात फटका बसल्याने मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. कापूस व धान पीक पावसाने भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.वर्षभराचे बजेट कोलमडलेखरिपातील पिकांवर शेतकºयांचा वर्षभराचा आर्थिक बजेट अवलंबून असतो. परंतु यावर्षी पावसाने शेतकºयांची इतकी बिकट अवस्था करून टाकली आहे की पुन्हा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर कर्जाचा डोंगर ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: काकुळतीला आला आहे. खरिपातील पिकांवर निसर्गाची वक्रदृष्टी पडल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा वर्षभराचा आर्थिक बजेटच कोलमडला आहे.रबी हंगाम कसा करावा?ऐनवेळी परतीच्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने हाती येणाऱ्या पिकांची पुरती वाट लागली आहे. दिवसरात्र शेतात राबूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीही उरले नाही. शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाल्याने आता रब्बी हंगाम कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी सोयाबीनचे ढिगारेच पाण्याखाली आले. कपाशी, धान, ज्वारी पिके उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी