नाफेडतर्फे तुर खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:41 IST2021-02-05T07:41:26+5:302021-02-05T07:41:26+5:30

चंद्रपूर : शासनाने तूर खरेदीसाठी प्रति क्विंटल रुपये सहा हजार दर मंजूर केला आहे. तूर खरेदीसाठी केंद्र शासनाने नाफेडची ...

NAFED starts buying tur | नाफेडतर्फे तुर खरेदी सुरू

नाफेडतर्फे तुर खरेदी सुरू

चंद्रपूर : शासनाने तूर खरेदीसाठी प्रति क्विंटल रुपये सहा हजार दर मंजूर केला आहे. तूर खरेदीसाठी केंद्र शासनाने नाफेडची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली असून नाफेडच्या वतीने राज्यामध्ये पणन महासंघामार्फत तूर खरेदी सुरू करण्यात आली आहे. तूर खरेदीचा नोंदणी कालावधी १९ एप्रिल २०२१ पर्यंत राहणार आहे.

चंद्रपूरसाठी भद्रावती, पोंभुर्णा, सावली व मूल, वरोरा खरेदी केंद्रासाठी वरोरा तालुका, चिमूर खरेदी केंद्राला ब्रह्मपुरी, सिंदेवाही व नागभीड, गडचांदूर खरेदी केंद्राला कोरपना व जिवती, राजुरा खरेदी केंद्राला गोंडपिपरी व बल्लारपूर तालुके जोडण्यात आले आहेत. खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी आपले आधार कार्ड, व्होटिंग कार्ड, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुक इ. संपूर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी व दिलेल्या मुदतीत तूर विक्रीकरिता खरेदी केंद्रावर जावे असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए. आर. गोगीरवार यांनी कळविले आहे.

Web Title: NAFED starts buying tur