शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकाऱ्यांसोबत मराशिपची सहविचार सभा

By admin | Updated: March 13, 2016 01:02 IST

मराशिप जिल्हा चंद्रपूर कार्यकारिणीची सहविचार सभा शिक्षक आमदार नागोजी गाणार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षणाधिकारी कार्यालयात झाली.

तळोधी (बा) : मराशिप जिल्हा चंद्रपूर कार्यकारिणीची सहविचार सभा शिक्षक आमदार नागोजी गाणार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षणाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्य) संजय डोर्लीकर उपस्थित होते.सदर सहविचार सभेत सन २०१३-१४ व १४-१५ या सत्रातील जिपीएफ पावत्या अनेक शाळांना प्राप्त झाल्या नाही. १ तारखेला कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळावे, चुकीच्या पद्धतीने झालेले समायोजन रद्द करणे, अप्रशिक्षीत कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी वरिष्ठ व निवड श्रेणीबाबत वेतनेतर अनुदान, शालेय पोषण आहार, आमदार विकास निधीला होणारा विलंब, शिक्षण विभागातील दफ्तर दिरंगाई, शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांशी वेतन पथक कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून असभ्य वागणूक, आकसापोटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढी रोखणे, काही शाळातील शिष्यवृत्ती वाटपात झालेला गैरव्यवहार, मुख्याध्यापकाकडून जनगणना काळातील सुट्यांची नोंद सेवापुस्तीकेत करण्यात टाळाटाळ करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.या सहविचार सभेत जनता विद्यालय नेरी, इंदिरा गांधी विद्यालय टेकरी, सर्वांग विकास विद्यालय सावरगाव, महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव, ब्रह्मपुरी येथे २००५ मध्ये झालेले सर्वशिक्षा अभियान प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे प्राप्त झाली नाही. शिवाजी नाईट स्कूल राजुरा, शिवाजी विद्यालय राजुरा, शिवाजी विद्यालय कोंढा, समाजसेवा विद्यालय वाढोणा, निरुपा विद्यालय रुई, संत हरदास विद्यालय भिंडाळा, इंदिरा गांधी विद्यालय जुनासुर्ला, आदर्श विद्यालय काजळसरा, सावित्रीबाई फुले विद्यालय गिरगाव, विद्याभूषण हायस्कूल, बाळापूर या शाळातील कर्मचाऱ्यांच्या प्राप्त तक्रारी तसेच २०१५-१६ चे संच निर्धारण व अतिरिक्त समायोजनाबाबत चर्चा करण्यात आली.या सहविचार सभेला आमदार नागो गाणार, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, वेतन पथक अधीक्षक गादेवार, जेऊरकर, मराशिपचे जिल्हा े पदाधिकारी मधुकर मुधीडकर, रामदास गिरटकर, विनोद वांढरे, हरिशचंद्र पाल, मनोहर झोडे, विलास वरभे, नरेंद्र राऊत, प्राथमिक विभागाच्या अध्यक्षा सोनकुसरे, कार्यवाह विकास नंदूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. (वार्ताहर)