शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचाऱ्यांचा संप अटळ

By admin | Updated: December 13, 2015 00:40 IST

मागील अनेक महिन्यांपासून मनपा आयुक्त आणि मनपा कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे आयुक्त...

वर्षभरापासून संघर्ष : विविध मागण्यांची पूर्तता करण्याची मागणीचंद्रपूर : मागील अनेक महिन्यांपासून मनपा आयुक्त आणि मनपा कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे आयुक्त सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत. मागण्यांबाबत चर्चा करायलाही आयुक्त तयार नाहीत. त्यामुळे आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मनपा कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप आता अटळ आहे.चंद्रपूर शहर महानगरपाालिकेतील कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्याबाबत मागील एक वर्षापासून संघटनेकडून सातत्याने मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मनपा प्रशासनाच्या हेकेखोर धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या १४ मागण्यांपैकी एकही मागणीची प्रशासनाकडून पुर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतीय नगरपरिषद कामगार संघाच्या नेतृत्वात १४ नोव्हेंबर २०१५ पासून मनपा कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केलेले होते व त्याबाबत मनपा प्रशासनाला कळविलेसुद्धा होते. त्यानंतरही आयुक्तांनी मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. किंवा या संदर्भात साधी चर्चा करण्याचे सौजन्यही दाखविले नाही.दरम्यान, ३० नोव्हेंबर २०१५ ला संघटनेने मनपा प्रशासनाला रितसर बेमुदत संपाची नोटीस बजावण्यात आली व त्यामध्ये ११ डिसेंबर २०१५ पर्यंत कर्मचाऱ्यांचा मागण्याची पुर्तता न झाल्यास १४ डिसेंबर २०१५ ला शुन्य तासापासून संपूर्ण कर्मचारी बेमुदत संपावर जाणार, असे मनपा प्रशासनाला सूचित करण्यात आलेले होते. ११ डिसेंबर २०१५ पर्यंत मनपा प्रशासनाकडून कोणतीही मागणीची पुर्तता न झाल्यामुळे त्याच दिवशी भारतीय मजदुर संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. शैलेश मुंजे, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतिश असरेट यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता द्वारसभा घेण्यात आली. सदर द्वारसभेत कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांची सविस्तर माहिती उपस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. सदर द्वारसभेत कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांची सविस्तर माहिती उपस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. सदर संपात सतिश असरेट यांनी पाठिंबा दर्शवून सर्व सफाई कामगारांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले.वारंवार निवेदन देऊनही मनपा प्रशासनाकडून कोणत्याच सकारात्मक हालचाली होत नसल्याने आता मनपा कर्मचाऱ्यांनी आंदोलन तिव्र करण्याची पूर्ण तयारी केली आहे. १४ डिसेंबरपासून बेमुदत संपाला सुरुवात होणार, हे अटळ असल्याचे मनपा वर्तुळात बोलले जात आहे.मनपातील सर्व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होवून प्रशासनाकडून मागण्या मान्य होतपर्यंत एकजुटीचा परिचय करून संप यशस्वी करावा, अशी विनंती आवाहन भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. शैलेश मुंजे, सुरेश आंबेकर, तुकड्यादास डुमरे, सारंग निर्मळे, संजय टिकले, सचिन माकोडे, वासंती बहाद्दुरे, विवेक पोतनुरवार, भुपेश गोठे, प्रदीप मडावी, संतोष गर्गेलवार, मनोज सोनकुसरे, महेंद्र हजारे, उदय मैलारपवार, अनिरूद्ध राजुरकर, मधुकर चिवंडे, मधु श्रीरामे आदींनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)