शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

महापालिकेचा २,१९१ नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 5:00 AM

कोरोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत व त्यानुसार मनपातर्फे मास्क लावण्याचे आवाहन दररोज करण्यात येते. मात्र तरीही शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे आढळून येत आहेत.

ठळक मुद्देगत महिन्यात चार लाख ४७ हजार ६९० रुपये वसूल : थुंकणे, मास्क न वापरणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम मोडणाऱ्या दोन हजार १९१ लोकांवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या पथकांनी कारवाई केली. जून महिन्यात नियमांचे पालन न करणाºया या नागरिकांकडून चार लाख ४७ हजार ६९० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात मास्कशिवाय फिरणाºया नागरिकांवर कारवाई करण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºया तसेच विनापरवानगी दुकान सुरु ठेवणाºया व अवैध खर्रा विक्री करणाºया दुकानदारांवरही दंड ठोठावण्यात आला आहे.कोरोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत व त्यानुसार मनपातर्फे मास्क लावण्याचे आवाहन दररोज करण्यात येते. मात्र तरीही शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे आढळून येत आहेत. याशिवाय काही दुकानदार विनापरवानगी दुकान सुरु ठेवत असल्याचे व अवैध खर्रा विक्री करताना आढळुन आल्याने मनपाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी चंद्रपुरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याने थुंकीच्या माध्यमातून कोरोनाच्या फैलावाची शक्यता आहे. अशा १८० लोकांवर मनपातर्फे कारवाई करण्यात आली आहे. मनपाच्या तीनही झोनमार्फत सक्तीने कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन प्रत्येक नागरिकाला दोन मास्कसुद्धा देण्यात येत आहे.सहायक आयुक्त सचिन पाटील, शितल वाकडे, धनंजय सरनाईक, विद्या पाटील यांच्या नेतृत्वात तीनही झोनचे क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, नरेंद्र बोभाटे, सुभाष ठोंबरे, अतिक्रमण विभागाचे राहुल पंचबुद्धे, नामदेव राऊत तसेच स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, उदय मैलारपवार, भूपेश गोठे, विवेक पोतनूरवार, महेंद्र हजारे, अनिरुद्ध राजुरकर, अनिल ढवळे यांच्या माध्यमातून या कारवाया करण्यात आल्या.रूग्ण वाढतेय नागरिक गंभीर नाहीमागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. असे असले तरी नागरिक मात्र गंभीर असल्याचे दिसत नाही. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने काही नियम सांगितले आहेत. मात्र त्याचे पालन होताना दिसत नाही. सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्क न वापरणे, रस्त्यावर थुंकणे, खोकलणे हे प्रकार सुरूच आहेत.

टॅग्स :Policeपोलिस