शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अ‍ॅपचा प्रसार करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:11 IST

सध्या देशात स्वच्छतेसंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. केंद्र शासनातर्फे स्वच्छता अभियानासंदर्भात विविध पुरस्कारही देण्यात येते. यासाठी महापालिकांसह नगरपरिषदाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या असून प्रथम क्रमांकासाठी चढाओढ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपथकांद्वारे वार्डावार्डात प्रचार : नागरिकांच्या संपर्क क्रमांकाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वच्छता अभियानामध्ये राज्यातच नाही तर देशात अव्वल स्थानी येण्यासाठी महानगरपालिकेतर्फे विविध प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात शहराची स्वच्छता केली जात आहे. तरीही नागरिकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता स्वच्छता अ‍ॅपद्वारे तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी पथकांचे गठण करण्यात आले असून पथकाद्वारे वार्डावार्डात फिरून माहिती देण्यात येत आहे.सध्या देशात स्वच्छतेसंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. केंद्र शासनातर्फे स्वच्छता अभियानासंदर्भात विविध पुरस्कारही देण्यात येते. यासाठी महापालिकांसह नगरपरिषदाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या असून प्रथम क्रमांकासाठी चढाओढ निर्माण झाली आहे. जिल्ह्यातून भद्रावती नगरपरिषदेने पुरस्कार पटकाविल्यानंतर इतर नगरपरिषदा आणि चंद्रपूर महानगरपालिकेनेही आता स्वच्छता मोहीम अधिक व्यापक राबविण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे, स्वच्छता अ‍ॅपद्वारे तक्रार केल्यास २४ तासामध्ये स्वच्छता करण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र अ‍ॅपद्वारे तक्रार करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने आणि शासनाचा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी स्वच्छता अ‍ॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या मोजली जात असल्यामुळे आता मनपाने त्यादृष्टीने प्रयत्न करणे सुरु केले आहे. काही सामाजिक संस्थांच्या मदतीने स्वच्छता अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करवून घेतले जात आहे.नागरिकांचा प्रतिसाद महत्त्वाचास्वच्छता अ‍ॅपचा वापर करण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे. अ‍ॅपद्वारे कचºयासंदर्भात तक्रार केल्यास २४ तासाच्या आत संबंधित कर्मचारी तो कचरा उचलणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात स्वच्छता अ‍ॅपचा वापर करणे गरजेचे आहे.