शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित कोविड रुग्णालयासमोर समस्यांचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 05:00 IST

मनपाच्या राणी हिराई सभागृहातील ऑनलाईन सर्वसाधारण सभेत  महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेते संदीप आवारी, गटनेते वसंत देशमुख, बसपाचे गटनेते अनिल रामटेके, चंद्रपूर शहर विकास आघाडीचे गटनेते प्रदीप देशमुख, शिवसेनेचे गटनेते सुरेश पचारे, सर्व नगरसेक, नगरसेविका आभासी माध्यमाद्वारे उपस्थित होते.

ठळक मुद्देमनपाची मंजुरी : नगरसेवकांनी संभाव्य विविध प्रश्नांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर मनपाने ४५ खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्याची तयारी सुरू केली. सध्याच्या चिंताजनक स्थितीमुळे प्रस्तावित रुग्णालयाच्या उपयोगितेला नगरसेवकांचा विरोध नाही. मात्र, डॉक्टर्स, प्रशिक्षित कर्मचारी, ऑक्सिजन व अन्य सुविधांबाबत मनपाकडे ब्लू प्रिंट नसल्याने समस्यांचा डोंगर पार करावा लागणार त्याचे काय, असा प्रश्न सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवकांनी गुरुवारी ऑनलाईन सर्वसाधारण सभेत विचारला आहे.मनपाच्या राणी हिराई सभागृहातील ऑनलाईन सर्वसाधारण सभेत  महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेते संदीप आवारी, गटनेते वसंत देशमुख, बसपाचे गटनेते अनिल रामटेके, चंद्रपूर शहर विकास आघाडीचे गटनेते प्रदीप देशमुख, शिवसेनेचे गटनेते सुरेश पचारे, सर्व नगरसेक, नगरसेविका आभासी माध्यमाद्वारे उपस्थित होते. कोविड रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी स्वतंत्र ४५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर  नगरसेवकांनी विविध सूचना करून प्रश्नांची सरबत्ती केली. नगरसेवक नंदू नागरकर यांनी कोविड रुग्णालय उभारण्यास आधीच उशिरा झाल्याचे सांगून, मदतभेद विसरून आता रुग्णालयासाठी सर्वांनी एकत्र यावे,  असे आवाहन केले.

४५ खाटांसाठी सव्वादोन कोटी खर्च अपेक्षित  नवीन बेघर निवारा येथे स्वतंत्र ४५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी दोन कोटी २५ लाखांचा निधी अपेक्षित आहे. आवश्यकतेनुसार टप्प्या-टप्प्याने खाटा वाढविण्यात येतील, अशी माहिती महापौर राखी कंचर्लावार यांनी सभेत दिली.  

रुग्णालयासाठी बॅरि. खोब्रागडे सभागृहाचा विचारप्रस्तावित ४५ खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यासाठी बाबूपेठ परिसरातील बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे सभागृहाची निवड करण्याचा विचार सुरू आहे. सर्व बेड्स ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सुविधायुक्त राहतील. रुग्णालयासाठी एक कोटीच्या आमदार निधीचे नियोजन सुरू असल्याची माहिती आयुक्त राजेश मोहिते यांनी दिली.

टिपणीत रुग्णालयाचा तपशीलच नाहीकोविड रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा देतानाच सभेसाठी काढण्यात आलेल्या टिपणीत रुग्णालयाबाबत अत्यंत त्रोटक माहिती आहे. रुग्णालयासाठी लागणारे डॉक्टर्स, आरोग्यसेविका, प्रशिक्षित मनुष्यबळ, रुग्णालय उभारण्याचा कालावधी याबाबत काहीच माहिती नाही. कोरोनाचा कहर सुरू असल्याने मनपाकडून नागरिकांना खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे हा विषय मार्गी लावताना येणाऱ्या संभाव्य अडचणींकडे काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता लोढीया, नंदू नागरकर व अन्य नगरसेवकांनी लक्ष वेधले. थेट मंजुरी आणण्याआधी नगरसेवकांची चर्चा करणे गरजेचे होते, अशी भूमिका सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनीही मांडली.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल