शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मशागतीसाठी गहाण शेतीची परस्पर विक्री

By admin | Updated: July 30, 2014 23:57 IST

गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याने स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनीपैकी साडेतीन एकर जमीन एका इसमाकडे वर्षभरासाठी गहाण ठेवली. उधार घेतलेल्या रकमेची

शेतकऱ्याची फसवणूक : पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखलवरोरा : गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याने स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनीपैकी साडेतीन एकर जमीन एका इसमाकडे वर्षभरासाठी गहाण ठेवली. उधार घेतलेल्या रकमेची व्याजासह परतफेड केल्यानंतर शेतीची पुनर्विक्री करून देण्याबाबतचा करारनामासुद्धा झाला होता. मात्र शेतकऱ्याला जराही शंका येऊ न देता त्या शेतजमिनीची परस्पर विक्री केल्याचा प्रकार वरोरा तालुक्यातील येन्सा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरोरा तालुक्यातील येन्सा येथील रमेश गुलाब अवघडे यांच्याकडे १७ एकर शेतजमिन असून मागील वर्षी ओल्या दुष्काळामुळे ते आर्थिक विंवचनेत होते. त्यांंनी ६० हजार रुपयांच्या कर्जासाठी साडेतीन एकर शेतजमिन चिकणी येथील दादाजी कर्डक यांच्याकडे गहाण ठेवली. शेतजमिन गहाण ठेवताना एक वर्षात ६० हजार रुपयांच्या कर्जापोटी १ लाख २० हजार रुपये देण्याचे ठरले होते. परंतु ६० हजार रुपये देताना अघवडे यांनी त्या शेतीची विक्री करून द्यायची आणि व्याजासह रक्कम परत मिळाल्यानंतर पुन्हा त्या शेतीची विक्री अवघडे यांना करून दिली जाईल. अशी अट कर्डक यांनी ठेवली होती. असे अवघडे यांचे म्हणणे आहे. त्यानुसार झालेल्या करारपत्रावर खांबाडा येथील पंढरी भोयर, दिनेश धोटे, बंडू मेश्राम हे साक्षीदार होते, असे अघवडे यांनी म्हटले आहे. अवघडे यांनी सर्वांवर विश्वास ठेवून ६० हजार रुपये घेतले व साडेतीन एकर शेतीची विक्री करून दिली. तसेच सहा महिन्यांपूर्वी अवघडे यांनी व्याजासह द्यावयाच्या रकमेपैकी ८० हजार रुपये कड्डक यांना दिले. दरम्यान सदर साडेतीन एकर शेतजमिन कड्डक यांनी नागपूर येथील व्यक्तीला परस्पर विकल्याची माहिती अवघडे यांना मिळाली. त्यामुळे अवघडे यांनी तातडीने तलाठी कार्यालय गाठून सत्यता जाणून घेतली असता त्यांना मिळालेली माहिती खरी असल्याचे समजले.या संदर्भात कड्डक यांना जाब विचारला असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याने अवघडे यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने अवघडे यांंनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नाही. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडत असलेल्या बळीराजाचा या माध्यमातून बळी घेण्याचे प्रकार वाढत आहे. आणखी काही प्रकरणेसमोर समोर येण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)