शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबातील जंगलापेक्षा शिवसेनेत अधिक वाघ

By admin | Updated: March 13, 2016 00:53 IST

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व राज्याचे वित्त तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शनिवारी नगराध्यक्ष सुवर्ण चषक

उद्धव ठाकरे : व्यासपीठावर रंगली राजकीय शेरेबाजीसचिन सरपटवार / विनायक येसेकर भद्रावतीशिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व राज्याचे वित्त तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शनिवारी नगराध्यक्ष सुवर्ण चषक क्रीडा स्पर्धा तथा राज्यस्तरिय बॉक्सिंग स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि ना. सुधीर मुनगंटीवार या मित्र पक्षांच्या दोन नेत्यांच्या भाषणांदरम्यान रंगलेली राजकीय शेरेबाजी चर्चेचा विषय ठरली. यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, आ.बाळू धानोरकर, बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जय कवळी, खासदार कृपाल तुमाने, माजी आमदार विश्वास नांदेकर, माजी मंत्री अशोक शिंदे, शिवसेना संपर्क प्रमुख विलास चावरी, शिवसेना जिल्हा प्रमुख, सतीश भिवगडे, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, मुख्याधिकारी विनोद जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार, चंद्रकांत गुंडावार उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम स्थानिक नीळकंठ शिंदे महाविद्यालयाच्या प्रांगणावर पार पडला. जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहेत आणि त्याचे संवर्धन करण्याचे काम मी हाती घेतले आहे, असे ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून सांगितल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून ना.मुनगंटीवार यांना उद्देशून शिवसेना हा वाघांचा पक्ष आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या संख्येपेक्षा शिवसेनेत अधिक वाघ आहेत, त्यांचेही संवर्धन करा, असे आवाहन त्यांनी ना. मुनगंटीवारांना केले. माझा खेळाला विरोध नाही. पण खेळाच्या आडून जो देशाला विरोध करीत असेल त्याला माझा विरोध आहे. तो मग कोणत्याही धर्माचा असो. खेळाडूंसोबत दहशतवादी पाठविण्याला माझा विरोध आहे, असे ठाकरे म्हणाले. हिमाचल प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानच्या खेळाडूंना आपल्या प्रदेशात खेळण्यासाठी परवानगी दिली नाही. मी त्यांचे स्वागत करतो, असे सांगून ठाकरे म्हणाले, ममताताईंनी आगामी निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून पाकला लाल गालिचाच्या घड्या घालून खेळण्यास परवानगी दिली. राजकारणात देशहिताच्या विरोधात काम करणाऱ्यांना जवळ केले जात असेल तर त्याला माझा विरोध आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले, खेळामध्ये एक ऊर्जा असते. ही ऊर्जा या ठिकाणावरून आपण न्यावी व दीनदुबळ्यांची सेवा करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी आ. बाळू धानोरकर यांनीही मनोगत व्यक्त केले.