२४ तासांत मोबाईल चोरटे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST2021-07-07T04:34:28+5:302021-07-07T04:34:28+5:30

चंद्रपूर : बाबूपेठ परिसरातून मोबाईल पळविणाऱ्या दोन चोरट्यांना शहर पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. आरोपींकडून चोरी केलेला ...

Mobile thieves found within 24 hours | २४ तासांत मोबाईल चोरटे गजाआड

२४ तासांत मोबाईल चोरटे गजाआड

चंद्रपूर : बाबूपेठ परिसरातून मोबाईल पळविणाऱ्या दोन चोरट्यांना शहर पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. आरोपींकडून चोरी केलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. साहिल कुमार सिंह (वय २४), रोहित लक्ष्मण कोमटी (२२) असे अटकेतील आरोपींची नाव आहे. मोबाईल घेऊन जात असताना बाबूपेठ परिसरात दुचाकीने जाणाऱ्या दोघांनी जबरीने मोबाईल पळविला. याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात रविवारी दाखल करण्यात आली. पोलिसांनी कलम ३९२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवून दोघांना अटक करून मोबाईल व मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कोरडे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघमारे, हेडकॉन्स्टेबल विलास निकोडे, स्वामी दास, सानप, मंगेश, प्रमोद व डीबीच्या पथकाने केली.

Web Title: Mobile thieves found within 24 hours