शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

By admin | Updated: October 31, 2015 01:52 IST

भारत कृषीप्रदान देश आहे. शेतकऱ्यांना सन्मान मिळावा व शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन ....

पुगलिया यांचा घणाघाती आरोप : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीसाठी पंतप्रधानांना निवेदनचंद्रपूर : भारत कृषीप्रदान देश आहे. शेतकऱ्यांना सन्मान मिळावा व शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना करण्यात आली. मात्र विद्यमान सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केला.चंद्रपूर जिल्हा विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी स्थानिक गांधी चौकात डॉ. एम. एस. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्या म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यमान सरकारवर टीका केली.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे युवा नेते राहुल पुगलिया, गजानन गावंडे, डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक प्रशांत दानव, उषा धांडे, जिल्हा परिषद सदस्य विनोद अहिरकर, बल्लारपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, चंद्रशेखर पोडे, अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती अ‍ॅड. हरिश गेडाम, नासिर खान, मजदूर सभेचे महासचिव वसंतराव मांढरे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. संचालन साईनाथ बुचे यांनी तर आभार गजानन गावंडे यांनी मानले.या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत नरेश पुगलिया यांनी विद्यमान सरकारच्या धोरणावरही टीका केली. सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी व शेती उत्पादनाला आधारभूत मूल्य मिळावे म्हणून नोव्हेंबर २००४ मध्ये डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली कृषी आयोगाची निर्मिती करण्यात आली. त्यात शेतमालाला हमीभाव देण्याची शिफारस करण्यात आली. मात्र सरकारने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. मदतही मिळत नसल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसत असल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)