शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात कोट्यवधीची उलाढाल

By admin | Updated: November 2, 2016 00:42 IST

जळगाव :यंदा जिल्‘ात सरासरीच्या १०० टक्के पाऊस झाल्याने शेतकरी वर्गासह नोकरदारांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत असुन, त्याचा परिणाम यंदाच्या दिवाळीत देखील पहायला मिळाला. यंदाच्या दिवाळीत बाजारपेठेत सुमारे ७० ते ८० कोटीहुन अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे बाजारात असलेली मंदीचे सावट यंदा दुर झालेले पहायला मिळाले. शहरातील सराफा बाजार, वाहन बाजार, कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनीक्स वस्तुंची मोठी उलाढाल झालेली पहायला मिळाली.

जळगाव :यंदा जिल्‘ात सरासरीच्या १०० टक्के पाऊस झाल्याने शेतकरी वर्गासह नोकरदारांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत असुन, त्याचा परिणाम यंदाच्या दिवाळीत देखील पहायला मिळाला. यंदाच्या दिवाळीत बाजारपेठेत सुमारे ७० ते ८० कोटीहुन अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे बाजारात असलेली मंदीचे सावट यंदा दुर झालेले पहायला मिळाले. शहरातील सराफा बाजार, वाहन बाजार, कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनीक्स वस्तुंची मोठी उलाढाल झालेली पहायला मिळाली.
गेल्या वर्षी दुष्काळाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर पहायला मिळाला. उत्पन्न न मिळाल्यामुळे शेतकरीवर्ग खरेदीपासुन दुरच होता. त्यामुळे बाजारात मंदी झालेली पहायला मिळाली. परंतु यंदा जिल्‘ासह संपुर्ण राज्यात वरुण राजाने चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्ग नफ्यात आहे. तसेच नोकरदारांना मिळालेल्या वेतन वाढीचा परिणाम बाजारात दिसुन आला.
सुवर्ण बाजार बहरला
सुवर्ण बाजारात सुमारे १० ते १२ कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचा अंदाज सराफा व्यापार्‍यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी सुवर्ण बाजारात अस्थिरतेचे वातावरण पहायला मिळाले. त्यामुळे गुंतवणुक दारांनी सोने खरेदीकडे पाठ फिरविली होती. तसेच त्यामुळे गेल्यावर्षी ऐन दिवाळीत २ ते ३ कोटीची उलाढाल झाली होती. परंतु यंदा सुवर्ण बाजारात गुंतरवणुकदारांसह नोकरदार, शेतकरीवर्गाकडुन मोठी खरेदी झाल्याची माहिती आर.एल.ज्वेलर्सचे व्यवस्थापक प्र्रकाश नहाटा यांनी दिली. तसेच पुढे येणार्‍या लग्नसराईमुळे देखील सोने खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याचा अंदाज आहे.
वाहनबाजारही सुसाट
वाहन बाजारात देखील मोठी उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिवाळीत ग्राहकांची मागणी पाहता विविध वाहन कंपण्याकडुन लोन मध्ये सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांकडून देखील चारचाकी वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती आहे. शहरात सुमारे दिवाळी काळात २ हजारहुन अधिक दुचाकी खरेदी झाल्याची माहिती वाहन होंडाचे व्यवस्थापक किरण चौधरी यांनी दिली. तर ३०० ते ३५० चारचाकी वाहनांची विक्री दिवाळीच्या चार दिवसात झाल्याची माहिती मानराज मोटर्सचे संचालक निंकुभ यांनी दिली. वाहन बाजारात सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांची उलाढाल यंदा दिवाळीत झाल्याचा अंदाज आहे. चारचाकी वाहनांसह शेतकरी वर्गाकडुन ट्रॅक्टरची देखील मोठी खरेदी झाली आहे.