शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी प्रतिष्ठाने चोरट्यांच्या रडारवर

By admin | Updated: November 4, 2015 00:47 IST

चंद्रपूर शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने सध्या चोरट्यांच्या रडारवर असून दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना,...

चंद्रपुरात टोळी सक्रिय : सणोत्सवाच्या काळात आर्थिक फटकाचंद्रपूर : चंद्रपूर शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने सध्या चोरट्यांच्या रडारवर असून दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, शहरात चोरट्यांची एक टोळीच सक्रिय झाल्याचे घडत असलेल्या घटनांवरून दिसून येते. तीन दिवसांपूर्वी चोरट्यांनी चंद्रपूर-नागपूर मार्गावरील तीन वेगवेगळी प्रतिष्ठाने फोडून हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याच्या घटनांनी व्यापारी वर्तुळ हादरून गेले आहे. दिवाळी सणाची लगबग सुरू झाली असून या पर्वावर व्यापाऱ्यांची विक्रीसाठीची खरेदी आटोपली आहे. दिवाळीनिमित्त आर्थिक उलाढालही वाढत आहे. अशातच आता चोरट्यांची टोळी शहरात सक्रीय झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. नागपूर मार्गावर सिव्हील लाईन परिसर व गजानन महाराज मंदिर चौकात झालेल्या घटनांतील चोरीची पद्धत ही एकाच स्वरूपाची असून त्यामुळे या तिनही दुकानांमध्ये एकाच टोळीने हात साफ केल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. मात्र अद्याप या चोरीतील धागेदोरे पोलिसांना गवसले नाहीत. दरवर्षीच सणोत्सवाच्या काळात चंद्रपुरात चोरटे सक्रिय होतात. यंदाही तिच परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. या घटनांना आळा घालणे पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरणारे आहे. एकूणच नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)