पावसाळी साहित्याने बाजार सजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:00:57+5:30

मागील वर्षी पावसाचे प्रमाण जास्त होते. तसेच यंदादेखील सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे छत्री, रेनकोट यासह इतर वस्तूंची विक्री आठवडाभरात वेग येणार आहे. महिन्याच्या प्रारंभीच वरुणराजाने हजेरी लावल्यामुळे रेनकोट, छत्र्या, पावसाळी टोप्या, ताडपत्री, प्लास्टिक पेपर आणि अन्य साहित्य विक्रीसाठी आले आहेत.

The market was adorned with rainwater | पावसाळी साहित्याने बाजार सजला

पावसाळी साहित्याने बाजार सजला

ठळक मुद्देआला पावसाळा : ग्राहकांची व्यापाऱ्यांना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असले तरी निसर्ग न चुकता आपली जबाबदारी पार पाडत आहेत. जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सुनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे व्यावसायिकांनी पावसाळी साहित्य विक्रीसाठी आणले असून दुकाने सजवली आहे. लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने शिथिलता दिल्यामुळे सर्व दुकाने खुली करण्यात आले आहे. छत्र्या, रेनकोट या खास पावसाळी वस्तूंची विक्री करणारी दुकाने गजबजले आहे.
मागील वर्षी पावसाचे प्रमाण जास्त होते. तसेच यंदादेखील सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे छत्री, रेनकोट यासह इतर वस्तूंची विक्री आठवडाभरात वेग येणार आहे. महिन्याच्या प्रारंभीच वरुणराजाने हजेरी लावल्यामुळे रेनकोट, छत्र्या, पावसाळी टोप्या, ताडपत्री, प्लास्टिक पेपर आणि अन्य साहित्य विक्रीसाठी आले आहेत.

लहान आकाराच्या छत्र्याही दाखल
बहुतांश छत्र्या एकच घडीच्या असतात. आता मात्र त्यात बदल झाला असून तीन घडी करुन अगदी लहान आकार होणाºया छत्र्यादेखील दाखल झाल्या आहेत. अशा लहान छत्र्या यावर्षी आकर्षण राहणार आहे. महिलांसाठी रंगीबेरंगी आणि बालकांच्या कार्टुन्सच्या चित्रांनी सजलेल्या छत्र्यांचा आकर्षक लूक ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत.

कार्टून रेनकोट
लहान मुलांमध्ये आकर्षण असलेल्या कार्टूनची प्रिंट असलेले रेनकोट्सदेखील दाखल झाले आहेत. डोरेमॅन, स्पायडर मॅन, नोबिता अशा विविध कार्टून्सची चित्र असलेल्या रेनकोट्सचे आकर्षण मुलांमध्ये असते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी या प्रकारातीह रेनकोट्सदेखील आणले आहे. त्याचबरोबर छोटा भीम, शक्तीमान यासारख्या सुपर हिरोंच्या रेनकोट्सनादेखील बाजारात मागणी वाढण्याची शक्यता आहे. लहान मुलांच्या आवडत्या कार्टुनसोबतच क्रिष्णा, भीमच्या चित्रांचे रेनकोट देखील बाजारात बालकांचा आकर्षणचा केंद्रबिंदू ठरत आहेत. सध्या बालकांच्यासाठीची खरेदी फारशी नसली तरी पुढील महिन्यात या मालाला मागणी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: The market was adorned with rainwater