बाजारामध्ये भाजपाल्यांची आवक वाढली

By Admin | Updated: December 20, 2014 22:36 IST2014-12-20T22:36:24+5:302014-12-20T22:36:24+5:30

हिवाळ्याची चाहुल लागताच हिरव्या पालेभाज्यांची मागणी जास्त असते. गावातील पालासह शहरातील भाजीबाजारावर सध्या हिरवळ पसरल्याचे दिसत आहे. मात्र मालाची आवक मागीलवर्षीपेक्षा

In the market, BJP's arrivals increased | बाजारामध्ये भाजपाल्यांची आवक वाढली

बाजारामध्ये भाजपाल्यांची आवक वाढली

चंद्रपूर : हिवाळ्याची चाहुल लागताच हिरव्या पालेभाज्यांची मागणी जास्त असते. गावातील पालासह शहरातील भाजीबाजारावर सध्या हिरवळ पसरल्याचे दिसत आहे. मात्र मालाची आवक मागीलवर्षीपेक्षा कमी असल्याने भावातील उतार मात्र तितकासा जाणवत नसल्याचे दिसत आहे.
यंदा जिल्ह्यात अत्पल्प पाऊस झाला. त्यामुळे याचा विपरीत परिणाम भाजी व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे हिवाळ्यात हिरव्या भाज्या विक्रीस दाखल झाल्या असल्या तरी त्याचे प्रमाण मात्र कमी झाल्याचे दिसते. सध्या बाजारात पालक, मेथी, कोथिंबीर यासारख्या हिरव्या पालेभाज्या ग्रामीणा भागातून बाजारात दाखल होत आहे. तसेच आलु, कोबी, वांगे यासारख्या भाज्याची आवकही वाढली आहे. सध्या भाजीबाजारात मेथी १५ ते २० रुपये किलो, पालक १० ते १५ रुपये किलो, कोथिंबिर २० ते ३० रुपये किलो तसेच वांगे आणि टमाटे २० ते २५ रुपये किलो असे दर पहावयास मिळत आहे. या भाज्यांसोबत भेंडी, वाल आदी भाज्यांची आवकही वाढली आहे.
सध्या या पालेभाज्या पाहिजे त्या प्रमाणात स्वस्त झाल्या नसल्या तरी बाकी भाज्यांच्या तुलनेत स्वस्त आणि ताज्या मिळत असल्याने आता मागणी वाढली आहे. रब्बी हंगामात सिंचनाची सोय असलेले शेतकरी हिरव्या भाज्यांवर जास्त जोर देतात. त्यामुळे काही दिवसात हिरव्या भाज्या आणखी स्वस्त होतील अशी चिन्हे दिसत आहे. हिवाळ्यात शरिवाला प्रथिनांची गरज जास्त असते. त्यामुळे या काळात हिरव्या भाज्या कडधान्ये, जास्त खाण्यावर डॉक्टर्स भर देतात. तुरीचे हिरवे दाणे, हिरवे मटर, मुंगण्याच्या शेंगा आदी भाज्यासी विक्रीस आल्या आहे. तुरीच्या शेंगा गावामध्ये मुबलक मिळत असल्या तरी शहरात विकत घ्याव्या लागतात. आवकही जास्त असून अत्यल्प किमतीत मिळत आहे. त्यामुळे बाजारात सध्या गर्दी बघायला मिळत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: In the market, BJP's arrivals increased