ब्रह्मपुरी न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:26 IST2021-01-21T04:26:35+5:302021-01-21T04:26:35+5:30

प्रा. डॉ. जगदीश मेश्राम यांनी मराठी भाषेचे महत्त्व पटवून देत संतसाहित्याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. अधिवक्ता हेमंत उरकुडे यांनी कार्यालयीन ...

Marathi language conservation fortnight in Brahmapuri court | ब्रह्मपुरी न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

ब्रह्मपुरी न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

प्रा. डॉ. जगदीश मेश्राम यांनी मराठी भाषेचे महत्त्व पटवून देत संतसाहित्याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. अधिवक्ता हेमंत उरकुडे यांनी कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा उपयोग करण्याचे सांगितले. न्यायाधीश एम. जी. मोरे यांनी आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर करावा जेणेकरून मराठी अस्मिता टिकून राहील, असे सांगितले.

यावेळी न्यायालयाचे सहायक अधीक्षक एम.जी. चांभारे यांच्या हस्ते कनिष्ठ लिपिक एच.जी खोब्रागडे व पी. एम. दशसहस्र यांचा वरिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. संचालन अधिवक्ता आशिष गोंडाणे यांनी केले. कार्यक्रमाला तालुका विधिज्ञ संघाचे अधिवक्ता छबी गोहणे, अधिवक्ता शरयू देवीकर, न्यायालयाचे सहायक अधीक्षक बी.यू. कपाटे, न्यायालयीन कर्मचारी संघप्रिया रामटेके, एन.एस बनकर, साबेर काझी, आशिष रामटेके, प्रशांत वालदे, पंकज कोल्हे, अंकुश मावस्कर, अजय जिभकाटे, नरेश पेंदोर, प्रियंका डोंगरे, सचिन रणदिवे इत्यादी कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते

Web Title: Marathi language conservation fortnight in Brahmapuri court