शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचतीची सुरूवात स्वत:पासून करा

By admin | Updated: March 17, 2016 01:00 IST

पाण्याचा अपव्यय टाळणे, हिच पाणी बचत असून प्रत्येकाने आपल्यापासून पाणी बचतीस सुरुवात केल्यास भविष्यातील पाणी संकट टाळता येईल,...

संध्या गुरुनुले : जल सप्ताहाचा शुभारंभ, पाच नद्यांवर जलपूजनचंद्रपूर : पाण्याचा अपव्यय टाळणे, हिच पाणी बचत असून प्रत्येकाने आपल्यापासून पाणी बचतीस सुरुवात केल्यास भविष्यातील पाणी संकट टाळता येईल, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी केले. जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या वतीने दाताळा पुलाजवळील इरई नदीच्या काठी आयोजित जल सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अधीक्षक अभियंता जी. मो. शेख, नगरसेवक संजय वैद्य व अंजली घोटेकर उपस्थित होत्या. विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या वैनगंगा, पैनगंगा, इरई, झरपट व वर्धा नदीतील पाण्याच्या कलशाचे पूजन करुन जिल्हाधिकारी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जल सप्ताहाचे उद्घाटन झाले. कमी होत चाललेला पावसाळा व घटत चाललेली भूगर्भातील पाण्याची पातळी पाहता भविष्यात गंभीर जल संकट निर्माण होऊ शकते, असे सांगत जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणाल्या, घरगुती वापरापासून पाण्याची बचत केल्यास भविष्यात भासणाऱ्या पाणी संकटावर मात करण्याची सुरुवात ठरु शकते. जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व शाळांमध्ये पाणी बचतीचे महत्त्व पटवून देणारे कार्यक्रम सप्ताहात घेण्यात येणार आहेत, असे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सातत्याने पाणी उपसा होत असल्याने भूगर्भातील पाणी पातळी कमी होत आहे. याचा परिणाम पर्जन्यमानावर झाला असून त्याचे परिणाम मराठवाड्यातील पाणी टंचाईवरुन दिसून येते. सुदैवाने आपल्या जिल्ह्यात मराठवाड्यासारखी स्थिती नसली तरी वेळीच उपाययोजना न केल्यास ही परिस्थिती केव्हाही येऊ शकते, ही बाब लक्षात घेता पाणी बचत अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रास्ताविक अधिक्षक अभियंता जी.मो. शेख यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या जल जागृती पोस्टरचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी) शाळांमध्ये जनजागृतीनागरिकांनी छोट्या छोटया प्रयत्नातून पाणी बचत केल्यास पाणी वाचवा ही संकल्पना पूर्णत्वास जाऊ शकते असे डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले. जिल्हा परिषदेतर्फे शाळांमध्ये पाणी वाचवा या विषयी जागृती करण्याचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे १७ शाळांमध्ये पाण्याचे महत्त्व पटवून देणारे विविध कार्यक्रम, व्याख्यान, स्पर्धा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.