शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरचे नाव ‘चांदागड’ करा

By admin | Updated: October 30, 2016 00:46 IST

मूलनिवासींनी इंग्रजांना दिलेल्या लढ्याचे स्मरण करण्यासाठी चंद्रपूरचे नाव ‘चांदागड’ करण्यात यावे,...

टी. एम. साव : गडचांदूर येथे शहीद दिवसगडचांदूर : मूलनिवासींनी इंग्रजांना दिलेल्या लढ्याचे स्मरण करण्यासाठी चंद्रपूरचे नाव ‘चांदागड’ करण्यात यावे, अशी मागणी मूलनिवासी संघाचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य टी.एम. साव यांनी केली.शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती व मूलनिवासी संघाच्या वतीने शहीद बाबुराव शेडमाके यांच्या १५८ व्या शहिददिनी अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी एम.टी. साव होते. साव यांनी सांगितले की, १८२३ पासून आमच्या मूलनिवासींनी इंग्रजांशी स्वातंत्र्याकरिता केलेल्या संघर्षांना इतिहासातून पूर्णपणे गारद करण्यात आले आहे. बाबुराव शेडमाके यांनी इंग्रजापासून स्वातंत्र्यासाठी रेगडी, घोट, मूलपर्यंत सैन्य उभे केले. सेठसावकारांच्या पाशातून सर्व मूलनिवासींना मुक्त केले. घोट येथे वैशाख पोर्णिमेला पेरसापेन पूजा सुरू असताना इंग्रजाचा कॅप्टन शेक्सपियरने घेरले. त्यामुळे ते रात्री झोपेतच पकडल्या गेले. पण ते रस्त्यात रोहिल्यांच्या हाती तुरी देवून निसटले. त्यांनी वैनगंगा घाटावर इंग्रज अधिकाऱ्यासह सर्व सैनिकांना कापून टाकले. शेवटी राजमाता लक्ष्मीबाई, अहेरी यांच्या करवी जेवन करताना पकडल्या गेले. त्यांना २१ आॅक्टोबरला चांदागड म्हणजे चंद्रपूर येथे जेलमधील पिंपळाच्या झाडाला फाशी देण्यात आली. आमच्या मूलनिवासींचा इतिहासच चांदागडाशी निगडीत आहे. तो शौर्याचा इतिहास समोर राहण्यासाठी चंद्रपूरचे नाव चांदागड करण्यात यावे, असे साव यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटन भद्रावती नगरपालिकेचे कर निर्धारक चरणदास शेडमाके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कविता मडावी, जिल्हा बँक माजी मानद सचिव जी.के. उपरे, जिल्हा बँक सचिव पांडुरंग जाधव आदींनी अभिवादन केले. संचालन शावलिन खोब्रागडे यांनी केले. प्रास्ताविक भीमराव पाटील व आभार अनिल शिडाम यांनी केले. याप्रसंगी गडचांदूर नगर परिषद उपाध्यक्ष सचिन भोयर, नगरसेवक चंद्रभागा कोरवते, शरद जागे, शरद बोरकर, मोतीराम करमनकर, दिगांबर झामरे, मूलनिवासी संघाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कायरकर, महेश टेकाम, कांबळे आदी अतिथी उपस्थित होते. (प्रतिनिधी)