शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने खरीप पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST

जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेती जंगल परिसराला लागून आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचा शिवारात नेहमी संचार असतो. परतीच्या पावसानंतर कापणीला आलेल्या धानाची प्रामुख्याने रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी जड धानपिकाची लागवड केली आहे. त्यामुळे कापणीला अद्याप वेळ आहे. सध्या हे पीक शेतात उभे असतानाच अवकाळी पावसाने नुकसान केले. पावसाने आता उसंत दिली.

ठळक मुद्देशेतकरी मेटाकुटीला; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एकीकडे निसर्गाच्या संकटाचा सामना करताना दमछाक होत असताना दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहे. जिल्ह्यातील वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाने यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेती जंगल परिसराला लागून आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचा शिवारात नेहमी संचार असतो. परतीच्या पावसानंतर कापणीला आलेल्या धानाची प्रामुख्याने रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी जड धानपिकाची लागवड केली आहे. त्यामुळे कापणीला अद्याप वेळ आहे. सध्या हे पीक शेतात उभे असतानाच अवकाळी पावसाने नुकसान केले. पावसाने आता उसंत दिली.शेतकरी कापणी करत असताना डुकरांकडून नासाडी होत आहे. खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. वन विभागाकडून पंचनामे केले जात आहेत. काही शिवारात पंचनाम्याची कामे सुरू आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर अहवाल तयार होईल. त्यानंतर शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळविण्यासाठी बराच कालवधी लागण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे.शेतकऱ्यांमध्ये दहशतजंगल परिसरात वन्यप्राण्यांचा नेहमीच मोठ्या प्रमाणात संचार आहे. वन्यप्राण्यांनी शेतकरी तसेच रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांवर अनेकदा प्राणघातक हल्ले केले. अनेकांचा मृत्यू झाला. मात्र अद्याप शासनाने प्रभावी उपाययोजना केली नाही. चिमूर, नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी तालुक्यातील भातशेती प्रामुख्याने जंगल भागाला लागूनच आहे. त्यामुळे शेतकºयांना जीव मुठीत घेऊनच शेतीची कामे करावी लागत आहेत.सरपंचांशी हवा समन्वयरबी हंगामातील हरभरा पिकाचे दरवर्षीच नुकसान होते. गावस्तरावर जनजागृती करून वनविभागाने मोहीम राबविण्याची गरज आहे. काही ठिकाणी वनरक्षकांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत आहे. परंतु सरपंच, उपसरपंच तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी वनरक्षक व अन्य वन कर्मचाऱ्यांचा समन्वय वाढविण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी