लोकमत सामाजिक बांधिलकी जपणारे वृत्तपत्र - निकम

By Admin | Updated: January 14, 2016 01:33 IST2016-01-14T01:30:42+5:302016-01-14T01:33:05+5:30

लोकमत वृत्तपत्र समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असते. हे वृत्तपत्र सामाजिक बांधिलकी जपणारे वृत्तपत्र असल्याचे प्रतिपादन सावलीचे पोलीस निरीक्षक व्ही.डी. निकम यांनी केले.

Lokmat Social Commitment Announcement - Nikam | लोकमत सामाजिक बांधिलकी जपणारे वृत्तपत्र - निकम

लोकमत सामाजिक बांधिलकी जपणारे वृत्तपत्र - निकम

सावली : लोकमत वृत्तपत्र समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असते. हे वृत्तपत्र सामाजिक बांधिलकी जपणारे वृत्तपत्र असल्याचे प्रतिपादन सावलीचे पोलीस निरीक्षक व्ही.डी. निकम यांनी केले.
‘संस्काराचे मोती स्पर्धा’ जरा हटके या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, बालवयापासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर वाचनाचे संस्कार घडवून त्यातून भारत देशासाठी मोती निर्माण करण्याचा प्रयत्न लोकमत समूह करीत आहे. त्यांच्या या स्पर्धेमुळे बालमनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहीजे, हा त्यामागचा उद्देश असल्याचेही ते म्हणाले. गुलाबशहा बाबा कॉन्व्हेंट येथे आयोजीत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाध्यक्ष डॉ. जलील शेख, प्राचार्य संदीप मेडपल्लीवार, राणी यशोधरा कॉन्व्हेंटच्या प्राचार्य पौर्णिमा गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत प्रथम पारितोषिक राणी यशोधरा कॉन्व्हेंटचा विद्यार्थी रोनित पारस वाळके याला, द्वितीय क्रमांक विश्वशांती विद्यालयाचा तन्मय राधाकीशन नुत्तलवार तर गुलाब शहा कॉन्व्हेंटची विद्यार्थीनी कृतिका शिंदे हिला तृतीय बक्षीस देण्यात आले. प्रास्ताविक उदय गडकरी तर संचालन हर्षा मेडपल्लीवार यांनी तर आभार वंदना रायपुरे यांनी मानले.

Web Title: Lokmat Social Commitment Announcement - Nikam