शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांच्या पडताळणीनंतरच यादी तयार करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST

जिवती : फेब्रुवारी २०२१ मध्ये होणा-या नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदाराचे नाव नोंदणी,पत्ता दुरूस्ती आदी कामे निवडणूक आयोगाकडून ...

जिवती : फेब्रुवारी २०२१ मध्ये होणा-या नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदाराचे नाव नोंदणी,पत्ता दुरूस्ती आदी कामे निवडणूक आयोगाकडून केली जात आहेत. जिवती नगर पंचायतीच्या मतदार यादीत बोगस मतदारांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांच्या पडताळणीनंतरच यादी तयार करण्याची मागणी नागरिकांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे निवेदनातून केली.

जिवती शहरातील यादी भाग क्र.१८४, १८५,१८६ मध्ये बाहेर गावातील सुमारे २०० मतदारांची नोंद झाल्याची शंका आहे.त्यांचा जिवती शहराशी संबंध नाही. घर, शेतीवाडी व्यवसाय, बीपीएल यादीतील नाव, राशन कार्ड त्यांच्या मूळ गावलाच आहे. केवळ राजकीय लाभासाठी मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यात आली. कुंभेझरी ग्राम पंचायतीची निवडणूक सहा महिन्यांपूर्वी झाली. या ग्रामपंचायतीमध्ये ४२ मतदारांनी मतदान केले. कुंभेझरी, चिखली (खुर्द) पाटागुडा, लेंडीगुडा, मरकलमेटा, केकेझरी, नारपठार, करणकोंडी, दमपूरमोहद, कोलंडी, गडचांदूर, नांदाफाटा, घुग्घुस, सांगवी, उमर, येथील नावे जिवती शहराच्या मतदार यादीत आहेत, असा आरोप महेश देवकते,कैलास राठोड,ममताजी जाधव,निशिकांत सोनकांबळे, मेहबूब शेख,मारोती बेल्लाळे,अमर राठोड,गजानन जुमणके, सुनीता वेट्टी, किरण चव्हाण आदिंनी निवेदनातून केला आहे.

बोगस नावे वगळावे

नि:पक्षपाती निवडणुकीसाठी मतदार यादीची चौकशी करून बोगस नावे वगळावे, तहसील कार्यालयात डिसेंबरची यादी अपडेट केली जात आहे. त्यातही काही बोगस नावे समाविष्ट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदार यादीचे प्रत्येक प्रभागामध्ये वास्तव्य करणा-या मतदारांची पडताळणी करावी. त्यानंतर अंतिम यादी तयार करावी, असेही निवेदनात नमुद केले आहे.