दारू विक्रेत्यांना आता थेट पोलीस कोठडीची हवा

By Admin | Updated: June 10, 2015 01:34 IST2015-06-10T01:34:51+5:302015-06-10T01:34:51+5:30

दारू विक्री करताना सापडल्यानंतर विक्रेत्याला लगेच जामिन मिळत होता. मात्र यापुढे पोलीस असे होऊ देणार नाही.

The liquor vendors are now in direct police custody | दारू विक्रेत्यांना आता थेट पोलीस कोठडीची हवा

दारू विक्रेत्यांना आता थेट पोलीस कोठडीची हवा

नवा फंडा : दारूबंदीसाठी पोलिसांनी कसली कंबर
चंद्रपूर : दारू विक्री करताना सापडल्यानंतर विक्रेत्याला लगेच जामिन मिळत होता. मात्र यापुढे पोलीस असे होऊ देणार नाही. दारू विक्रेत्याला न्यायालयासमोर उभे करून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता अवैध दारू विक्री करणे चांगलेच महाग पडणार आहे.
येथे नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी चांगलीच गंभीरतेने घेतली आहे. त्यांच्याच आदेशावरून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रीच्या विरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. यातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त केली जात आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत अवैधरित्या दारू बाळगणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
आता तत्काळ जामीन नाही
पूर्वी दारू विक्री करताना सापडल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने दारू विक्रेत्याला जामिन देण्यात येत होती. परंतु यापुढे असे होऊ नये, यासाठी पोलिसांचे प्रयत्न राहणार आहेत. संबंधित दारू विक्रेत्याने दारू कुठून आणली. कुणाकडून ती मिळविली. तसेच कुणाकडून दारूचा पुरवठा होत आहे, याचा सखोल तपास करण्यासाठी दारू विक्रेत्याला न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे उभे करण्यात येणार आहे. या मुद्यावर न्यायदंडाधिकाऱ्यांकडून आरोपीची पोलीस कोठडी मंजूर करून घेण्यात येत आहे.
११ जणांची रवानगी
या विशेष मोहिमेंतर्गत सोमवारी ११ जणांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यात चिमूर पोलीस ठाणे हद्दीत तीन, भद्रावती पोलीस ठाणे हद्दीत एक, सिंदेवाही पोलीस ठाणे हद्दीत तीन, बल्लारपूर पोलीस ठाणे हद्दीत चार दारू विक्रेत्यांचा समावेश आहे.

Web Title: The liquor vendors are now in direct police custody