शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

३४ दिवसांच्या दिर्घ उपचारानंतर युवकाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:29 IST

पाॅझिटिव्ह स्टोरी सास्ती(चंद्रपूर) : राजुरा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक लांजेवार यांच्या रुग्णांनावरील वेगवेगळ्या उपचार पद्धतीने ते ...

पाॅझिटिव्ह स्टोरी

सास्ती(चंद्रपूर) : राजुरा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक लांजेवार यांच्या रुग्णांनावरील वेगवेगळ्या उपचार पद्धतीने ते दवाखान्यातील देवदूतच असल्याची भावना रुग्णालयात मागील ३४ दिवसांपासून उपचार घेतल्यानंतर मंगळवारी सुटी होऊन सुखरूप घरी परतलेल्या गजानन भोपये या तरुण रुग्णासह अन्य रुग्णांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

शासकीय रुग्णालयातील डॉक्टर म्हणजे अर्धे लक्ष त्यांच्या खाजगी दवाखान्याकडे व अर्धे लक्ष नोकरीकडे असे असतात. मात्र राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुळमेथे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. लांजेकर हे मागील वर्षांपासून राजुरा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात डेडीकेटेड कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत आहेत. ते रुग्णांना कोरोनावरील औषधोपचारासह त्याला पर्यायी इतर औषधोपचार देत होते. आदर्श डॉ. हिंमत्तराव बाविस्कर यांच्या औषधोपचार पद्धतीनुसार उपचार करीत आहे. स्वतः प्रत्येक रुग्णांजवळ जाऊन वाफारा देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, हिंमत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. खालावलेली ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधे दिली जात आहे.

उपजिल्हा रुग्णालयात ८९-९४ ऑक्सिजन पातळी असलेल्या रुग्णांनाच दाखल करता येत होते. मात्र, जिल्हा पातळीवर रुग्णांना दाखल करण्यासाठी जागेची कमतरता असल्याने याठिकाणी ५५-६० ऑक्सिजन पातळी असलेल्या रुग्णांना दाखल करीत आहे. २ एप्रिलपासून आतापर्यंत येथे १८५ रुग्णांना दाखल केले असून १३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर इतर रूग्णांना चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. तर २२ रुग्ण मृत पावले आहे. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त वयोगटातील ४५ रुग्ण बरे झाले आहेत. मागील ३४ दिवसांपूर्वी चुनाळा येथील युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांची ४८-५० ऑक्सिजन पातळी होती. याच रुग्णाचे ऑक्सिजन (दि.२४) ९५-९६ झाले असून त्यांना डिस्चार्ज प्रमाणपत्र देऊन सुटी देण्यात आली. यावेळी चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर व रुग्णालयातील संपूर्ण कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा देत निरोप दिला.

कोट

रुग्णांना नियमित उपचार पद्धतीत बदल करून परिस्थितीनुसार औषधोपचार केला जात आहे. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून प्रतिकार शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आताच्या घडीला १८ रुग्ण दाखल असून ४८ ऑक्सिजन असलेल्या रुग्णांची पातळी ९६ झाली असून तो घरी परतला आहे.

-डॉ. विवेक लांजेकर, वैद्यकीय अधिकारी.

मी बाहेर गावावरुन आलो असता मला ताप व श्वास घेण्यास त्रास होता. यामुळे मी दवाखान्यात जाऊन तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह व ऑक्सिजन पातळी ४८ होती. सरपंच बाळनाथ वडस्कर यांच्या मदतीने दवाखान्यात दाखल झालो असता डॉक्टरांच्या उपचाराने ३४ दिवसानंतर सुखरूप घरी आलो आहे. डॉ. लांजेकर यांनी उत्तम प्रकारे उपचार व हिंमत दिली .

- गजानन भोयपे, बरा झालेला रुग्ण, चुनाळा.