कायद्याचा सन्मान झाला पाहिजे

By Admin | Updated: November 16, 2015 01:02 IST2015-11-16T01:02:48+5:302015-11-16T01:02:48+5:30

कायद्याच्या चाकोरीतून कार्य केले पाहिजे. कायद्याचा सन्मान झाला पाहिजे. असे झाले तरच सामाजिक स्वास्थ उत्तम राहिले, ..

The law should be respected | कायद्याचा सन्मान झाला पाहिजे

कायद्याचा सन्मान झाला पाहिजे

विहीरगावात कायदेविषयक शिबिर
राजुरा : कायद्याच्या चाकोरीतून कार्य केले पाहिजे. कायद्याचा सन्मान झाला पाहिजे. असे झाले तरच सामाजिक स्वास्थ उत्तम राहिले, असे प्रतिपादन साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय विहीरगाव येथे आयोजित कायदेविषयक साक्षरता शिबिराप्रसंगी मार्गदर्शन करताना राजुराचे दिवाणी न्यायाधीश पी.के. नरडेले यांनी केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश एस.बी. विजयकर, अ‍ॅड. सदानंद लांडे, अ‍ॅड. मुर्लीधर देवाळकर, विद्याविहार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अरूण धोटे, विहीरगावचे उपसरपंच इर्शाद शेख, ज्येष्ठ नागरिक पिल्लाजी साळवे, प्रास्ताविक प्राचार्य एस. लोहे यांनी केले. संचालन बोभाटे यांनी केले. आभार नळे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The law should be respected