शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांना सोडण्यास लालपरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST

मजुरांना त्यांच्या गावात एसटीने घेऊन जाण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मजुरांनी आपल्या नावाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात केल्यानंतर यादी प्रमाणित करून ती तहसीलदारांमार्फत आगार प्रमुखांना देण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. प्रवासादरम्यान सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आला आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर विभाग : यादी प्राप्त होताच धावणार बस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या मूळगावी नेऊन सोडण्यासाठी चंद्रपूर विभागातील बसेस सज्ज झाल्या आहेत. आगाराकडे मजुरांची यादी येताच बसेस सोडण्यात येतील, असे विभाग प्रमुख आर. एन. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी राजूरा डेपोमधून मजुरांना घेऊन तीन बस गोंडपिपरीकडे रवाना झाल्या आहेत.लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहे. यासाठी सर्व वाहक-चालक व कर्मचाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. मजुरांना त्यांच्या गावात एसटीने घेऊन जाण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मजुरांनी आपल्या नावाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात केल्यानंतर यादी प्रमाणित करून ती तहसीलदारांमार्फत आगार प्रमुखांना देण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. प्रवासादरम्यान सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आला आहे. तहसील प्रशासनामार्फत मजुरांची यादी प्राप्त होताच या बसेस मजुरांना घेवून रवाना होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.पुन्हा गावागावातलॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना राज्य व परराज्यात एसटीने नेण्यात येणार असल्याचे पत्र ९ मे रोजी मुख्य सचिवांनी काढले आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी एकत्रित समन्वय साधून आढावा घ्यावा व सर्व प्रवाशी वाहतूक सुरक्षीत होईल, याची दक्षता घ्यावी असेही पत्रात म्हटले आहे. शासनाच्या या निर्णयाने २३ मार्चपासून बंद असलेली एसटी पुन्हा धावणार आहे. लॉकडाऊनच्या काळात एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व बसेस आगारात उभ्या आहेत. मागणी न आल्यास पुन्हा १७ मे पर्यंत एसटीची चाके बंदच राहणार आहेत. येथील आगारातील सर्व कर्मचारी सज्ज आहेत. गाड्यांची साफसफाई करून ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक