शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

कोठारीच्या महिला डॉक्टरची तडकाफडकी उचलबांगडी

By admin | Updated: October 11, 2014 23:02 IST

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांशी असभ्य वर्तन करणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.

कोठारी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांशी असभ्य वर्तन करणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. १० आॅक्टोबरला मारोती चंदावार रुग्ण उपचारासाठी कोठारी येथील आरोग्य केंद्रात आला. मात्र दवाखान्यात गेला असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहलता रेड्डी यांनी त्याच्यावर उपचार घेण्यासाठी पुढाकार घेतला नाही. उलट रुग्णासह त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीला अर्वाश्च भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारदेखील करण्यात आली. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची वार्ता गावकऱ्यांना समजताच गावकऱ्यांनी पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविला. डॉक्टरच्या अशा असभ्य वर्तनाने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. कोठारीचे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.रायपुरे उच्च शिक्षणासाठी गेले असल्याने त्यांचा तात्पुरता कार्यभार डॉ. गवाने यांच्याकडे देण्यात आला होता. त्यानंतर यापूर्वी वादग्रस्त ठरून बदली झालेल्या डॉ. स्नेहलता रेड्डी यांना कोठारीत पुन्हा पाठवून त्यांच्या खांद्यावर रुग्णांच्या उपचाराचा भार देण्यात आला. मात्र डॉ. रेड्डी यांच्या कार्यशलीत तसुभरही सुधारणा झाली नाही. त्यांनी कोठारीत रुजू झाल्यापासून रुग्णांशी असभ्य वागणूक सुरू केली. वेळीअवेळी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना येथे उपचारासाठी कशाला येता असे म्हणून शिवीगाळ करणे, रुग्णांची तपासणी न करता औषधी देणे, घरी बोलविण्यासाठी जाणाऱ्या नातेवाईकांना अशोभनीय शब्दात बोलून रुग्णांना दवाखान्यातून हुसकावून लावणे आदी प्रकार सुरू केले. अशा घटनांमध्ये दिवसागणिक वाढ झाली. त्यामुळे गावकरी संतापले. १० आॅक्टोबरला घडलेल्या घटनेनंतर डॉ.रेड्डी व तिच्या पतीविरुद्ध तक्रार दाखल करुन त्यांची त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी केली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सहाय्यक आरोग्य संचालक डॉ. दीपक सेलोकर यांना कोठारीत पाठविले. त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करुन डॉ. स्नेहलता रेड्डी यांना हटवून त्यांचा तात्पुरता कार्यभार विसापूर येथील डॉ.कुकडपवार यांचेकडे सोपविला. डॉ. स्नेहलता रेड्डी या नेहमीच वादग्रस्त राहिल्या आहेत. कोठारीत रुजू होण्यापूर्वी त्या चिमूर तालुक्यातील भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना तेथेही त्यांचे वर्तन असेच होते. तेथे जनआंदोलन झाल्यानंतर त्यांना कोठारीत पाठविण्यात आले होते. (वार्ताहर)