शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वाघाला ठार मारा, लोकप्रतिनिधी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 05:00 IST

वनविभागासमोर नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आहे. मध्य चांदा वन विभागांतर्गत राजुरा व विरुर वनपरिक्षेत्रामध्ये वाघाचा धुमाकूळ आहे. यात दहा निष्पाप शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे. वनाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे वाघ मोकाट असून शेतकऱ्यांचे बळी जात आहेत. वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा किंवा ठार मारा, अशी मागणी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केली असून आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र । तीव्र आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रातील नरभक्षी वाघाने निरपराध दहा शेतकऱ्यांचा बळी घेतल्यानंतर वाघाला ठार करा आणि दोन्ही वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तत्काळ निलंबित करा व वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्यांना वनविभागात नोकरी देण्याची मागणी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून वनविभागाने वेळीच वाघाचा बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिलेला आहे.वनविभागासमोर नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आहे. मध्य चांदा वन विभागांतर्गत राजुरा व विरुर वनपरिक्षेत्रामध्ये वाघाचा धुमाकूळ आहे. यात दहा निष्पाप शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे. वनाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे वाघ मोकाट असून शेतकऱ्यांचे बळी जात आहेत. वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा किंवा ठार मारा, अशी मागणी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केली असून आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे.बाळू धानोरकरांची वनमंत्र्याशी चर्चाचंद्रपूर : राजुरा, विरूर वनपरिक्षेत्रात नरभक्षी वाघाने गेल्या २२ महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. यासंदर्भात शनिवारी खासदार बाळू धानोरकर यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. दीडशेच्या आसपास कॅमेरे असून वनकर्मचाऱ्यांचे पथकही दिवसरात्र नरभक्षी वाघाचा शोध घेत आहेत. वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले नाही. शनिवारी खासदार धानोरकर यांनी मुख्य वनसंरक्षक प्रवीण कुमार यांच्याशी बैठक घेतली. त्यानंतर वनमंत्री राठोड यांच्याशी चर्चा केली. या नरभक्षी वाघाला गोळ्या झाडा, अशी मागणही त्यांनी चर्चेत केली.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग