शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

केवाडावासीयांनी सुरू केले स्वच्छता अभियान

By admin | Updated: February 2, 2016 01:16 IST

चिमूर पंचायत समिती अंतर्गत केवाडा (पेठ) येथील गावात व ताडोबा तथा तपोभूमीच्या मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले होते.

शौचालयाचा वापर सुरू : दर मंगळवारी राबविणार मोहीमपेंढरी (कोके) : चिमूर पंचायत समिती अंतर्गत केवाडा (पेठ) येथील गावात व ताडोबा तथा तपोभूमीच्या मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. याबाबत ‘लोकमत’ने १७ जानेवारीला ‘पर्यटकांच्या मार्गावरील गावात अस्वच्छतेचे कळस’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच गावकऱ्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली असून शौचालयाचा वापर करणे सुरू केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण भारत देशाला स्वच्छतेचा मंत्र दिला. त्यानुसार देशातील गाव, रेल्वेस्थानक, शहर, नद्या, देवस्थाने, पर्यटन, तीर्थस्थळ मोठ्या जोमाने स्वच्छ केल्या जात आहेत. परंतु चिमूर तालुक्यातील केवाडा (पेठ), लोहारा हे गाव अस्वच्छतेच्या विळख्यात होते. सदर गावात शौचालय असूनसुद्धा तेथील जनता शौचालयाचा वापर करीत नसत. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. लोकमतने वृत्त प्रकाशित करताच, येथील कृष्णकांत वसाळे यांनी सरपंच राजेंद्र नैताम, उपसरपंच शशिकला निकोडे, ग्रामसेवक तुषार सहारे व ग्राम पंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, तरुण, शालेय विद्यार्थी, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते व श्री हनुमान देवस्थान कमेटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन श्री हनुमान देवस्थानच्या पटांगणात जनजागृती व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला.यात प्रा.नीळकंठ लोनबले यांनी स्वच्छता, रोगमुक्ती, वन संगोपन तथा संवर्धन, जागतिक तापमान, पाणी व्यवस्थापन, शौचालयाचा वापर व त्याचे महत्त्व, महिलांचे आरोग्य इत्यादी विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले. त्यानंतर स्थानिक प्रशासन व गावकऱ्यांनी संकल्प करून दररोज गाव स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला. गावातील महिलांनी शौचालयाचा नियमित वापर करणे सुरू केले आहे. तसेच गावातील कोणीही मुख्य रस्त्यावर शौचास बसणार नाही असा संकल्प केला. गावकऱ्यांनी या निर्णयाची अंमलबजावणीदेखील सुरू केली आहे. गोंदेडा यात्रेनिमित्त गावात व मुख्य रस्त्यावर तोरण पताका लावून रस्ते सुशोभित करण्यात आले होते. प्रवेशद्वार द्वार लावून गावाचा चेहरामोहराच बदलविला. मोहीम बारमाही सुरू राहील, असे गावकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)