शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

कंटेन्मेंट झोन झाल्याने ऐन हंगामात करंजीवासी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:01 IST

शुक्रवारी उशिरा रात्री स्थानिक प्रशासनाला त्या युवकाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून त्या युवकास ताबडतोब चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्रात हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर करंजी गाव कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. शेतीच्या ऐन हंगामात गाव कंटेनमेंट झोन झाल्याने गावकरी संतापले आहेत.

ठळक मुद्देयुवकाला संस्थात्मक अलगीकरणात का ठेवले नाही ? : गावकऱ्यांचा संतप्त प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : तालुक्यातील करंजी येथील एक २२ वर्षीय तरुण रोजगारासाठी तेलंगणातील हैदराबाद येथे गेला होता. लॉकडावून काळात गेल्या चार दिवसांपूर्वी परतल्यानंतर शासनाचे वतीने नोंद करून घेत त्याला गृह विलगीकरणात ठेवण्यात आले होते. शुक्रवारी उशिरा रात्री स्थानिक प्रशासनाला त्या युवकाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून त्या युवकास ताबडतोब चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्रात हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर करंजी गाव कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. शेतीच्या ऐन हंगामात गाव कंटेनमेंट झोन झाल्याने गावकरी संतापले आहेत. सदर युवकाला आधीच संस्थात्मक अलगीकरणात का ठेवले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तालुक्यातील करंजी गावातील बहुतांश मजूर हे रोजगाराच्या शोधात बाहेर राज्यात गेले होते. त्यापैकीच एक असलेल्या २२ वर्षीय तरुण रोजगारासाठी हैदराबाद येथे गेला होता. पाच दिवसांपूर्वी तो युवक आपल्या मूळ गावी परतला. प्रशासनाने त्याला गृह विलगीकरणात ठेवले.याच दरम्यान त्या युवकास कोरोनाचे लक्षण जाणवत असल्याने त्या युवकाचा स्वब नमुना तपासणीसाठी पाठविला. शुक्रवारी रात्री उशिरा त्या युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर प्रशासनाने संपूर्ण करंजी गाव कंटेनमेंट झोन घोषित केले आहे. सदर युवक गावात फिरल्याची माहिती आहे.परराज्यातून रेडझोनमधून परतलेल्या मजुराला गृह विलगीकरणात ठेवण्यापेक्षा संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला असता तर आज करंजी गावाला कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले नसते. सध्या शेती हंगाम सुरू असून करंजी गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने अनेक मजुरांचा रोजगार हिरावला असून या परिस्थितीस पूर्णता ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार आहे.-तुकेश पत्रुजी वानोडे,माजी तंमुस अध्यक्ष तथा ग्रा. प. सदस्य, करंजी 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या