शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

विविध समस्यांनी जिवती तालुका बेजार

By admin | Updated: November 8, 2014 22:35 IST

निसर्गाने नटलेल्या माणिकगड पहाडावरील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्याची निर्मिती झाल्यानंतरही संपूर्ण तालुका विविध समस्यांनी बेजार आहे. तालुक्यातील गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात

शंकर चव्हाण - जिवतीनिसर्गाने नटलेल्या माणिकगड पहाडावरील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्याची निर्मिती झाल्यानंतरही संपूर्ण तालुका विविध समस्यांनी बेजार आहे. तालुक्यातील गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी १० ते १५ किलोमीटर अंतर पार करावे लागते. रेशन दुकानावरचे धान्य आणण्यासाठी नागरिकांना दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते. याच तालुक्यात आंध्र-महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. गैरआदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकी हक्कासाठी अद्यापही संघर्ष सुरू आहे. या साऱ्या समस्यांबाबत शासन आणि प्रशासन अद्यापही गंभीर नाही. दिवसेंदिवस निसर्गाच्या भरवशावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. ‘निर्सग साथ देईना, उत्पन्न हातात येईना’ अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याने रोजगारासाठी गावेच्या गावे मुलांना सोबत घेऊन स्थलांतरित होत आहेत. तालुक्यात नागरिकांना रोजगार मिळेल असे कोणतेही उद्योग या तालुक्यात नाहीत. रोजगार हमीची कामेसुद्धा सुरू झाली नाहीत.दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या तालुक्यातील अनेक गावांत कुपोषणाचे प्रमाणही वाढत आहे. कुपोषणाच्या नावाखाली शासनाकडून अनुदान लाटणाऱ्या संस्थाही दिवाळखोरीत निघाल्या आहेत. एकीकडे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात, त्यांचे जीवनमान उंचावे, यासाठी अनेक योजना राबविल्यानंतरही जिवती तालुक्यात वीज, आरोग्य, रस्ते, पाणी, शेतकऱ्यांचा जमिनीचा मालकी हक्क, ५० वर्षांच्या वास्तव्याच्या पुराव्याअभावी जातीचा दाखला काढण्यासाठी होणारी विद्यार्थ्यांची फरफट आजही कायम आहे. या समस्या कधी सुटणार, अशा विवंचनेत जिवती तालुक्यातील नागरिक आहेत. (तालुका प्रतिनिधी)