नगरपंचायत इमारत, नव्हे हे तर व्हाईट हाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 06:00 AM2019-09-20T06:00:00+5:302019-09-20T06:00:42+5:30

या नगरपंचायतीच्या डिझाईनमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधांसाठी विशेष व्यवस्था आहे. स्वागत कक्ष, पिण्याचे शुध्द पाणी, स्वच्छ प्रसाधन गृह, शंभर खूर्चांचे भव्य सभागृह आहे. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी, सभापती, उपसभापती, विरोधी पक्ष नेता यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष आहे.

It's not the Nagar Panchyat, it's the White House! | नगरपंचायत इमारत, नव्हे हे तर व्हाईट हाऊस !

नगरपंचायत इमारत, नव्हे हे तर व्हाईट हाऊस !

Next

चंद्रपूर : आजपर्यंत आदिवासीबहुल व दुर्गम, मागासलेले गाव म्हणून ओळखले जात असलेले पोंभूर्णा हे गाव आता विकासाचे शहर म्हणून नावारुपास आले आहे. या शहरात आता चक्क ‘व्हाईट हाऊस’ उभे असून ते आकर्षणाचे केंद्र बनले आहे. हे व्हाईट हाऊस म्हणजेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारलेले पोंभूर्णा नगरपंचायत भवन आहे. चंद्रपूर या जिल्हास्थळपासून ४५ किलोमीटर अंतरावर वसलेले व चारही बाजुंनी जंगलाने वेढलेले आदिवासीबहुल गाव म्हणजे पोंभूर्णा. १७ जून २०१५ रोजी येथे ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाले आणि शहराची विकासयात्रा सुरू झाली. येथे नगरपंचायत भवन बांधणे प्रस्तावित होते. अशातच एकदा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची इमारत बघितली. आणि तेव्हाच त्यांनी ठरविले की पोंभूर्णा नगरपंचायतची नवी इमारत अशीच असेल. त्यांची संकल्पना आज पूर्णत्वास आली आहे. या नगरपंचायतीच्या डिझाईनमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधांसाठी विशेष व्यवस्था आहे. स्वागत कक्ष, पिण्याचे शुध्द पाणी, स्वच्छ प्रसाधन गृह, शंभर खूर्चांचे भव्य सभागृह आहे. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी, सभापती, उपसभापती, विरोधी पक्ष नेता यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष आहे. या भवनात नैसर्गिक शुध्द हवा खेळत रहावी, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. इमारतीच्या छतावर छोटेखानी सौर उर्जा प्रकल्प उभारला आहे. १३ सप्टेबरला व्हाईट हाऊस या नावाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन होऊन ही इमारत नागरिकांच्या सेवेत आली. या भवनामुळे पोंभूर्णा शहराचे सौंदर्यही वाढले आहे. मोतीच्या रंगाचे हे भवन दिवसा तर सुंदर दिसतेच; पण रात्री चंद्रप्रकाशात त्याचे सौंदर्य आणखी निखळते. या भवनाची जिल्ह्यातच नाही तर आता राज्यभरात चर्चा केली जात आहे.

Web Title: It's not the Nagar Panchyat, it's the White House!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.