शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नि:शब्द वातावरणात झाला डाॅ. शीतलच्या शर्विलचाा वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:29 IST

फोटो-०४सीपीपीएच१६ - शर्विलचे आपल्या आईवडिलांसोबतचे संग्रही छायाचित्र. वरोरा(चंद्रपूर) : डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूला आज पाच दिवस झाले. डाॅ. ...

फोटो-०४सीपीपीएच१६ - शर्विलचे आपल्या आईवडिलांसोबतचे संग्रही छायाचित्र.

वरोरा(चंद्रपूर) : डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूला आज पाच दिवस झाले. डाॅ. शीतलचा सहा वर्षीय मुलगा शर्विलचा आज वाढदिवसही होता. दरवर्षी आई डाॅ. शीतल वृक्ष लागवड करून आपल्या चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करायची. आज शर्विलने आईच्या आठवणीत वृक्ष लावून आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी आनंदवनातील वातावरण भावूक आणि नि:शब्द होते.

वृक्ष लागवड केल्यानंतर शर्विल आपल्या आईच्या समाधीजवळ गेला. त्यावेळी त्याच्या डोळ्यात आसवे होती. हातात जास्वंदाचे फूल घेऊन बोबड्या शब्दात मम्मा म्हणत त्याने आपल्या आईला ते अर्पण केले. या भावूक क्षणाचे साक्षीदार त्याचे वडील गौतम करजगी, आजोबा डाॅ. विकास आमटे, आजी भारती आमटे, सुहासिनी करजगी व शिरीष करजगी यांच्यासह आनंदवनातील परिवार होता. शर्विल आईविना पोरका झालेला आहे. तो सतत आईची आठवण करतो आहे. त्याचे मन कुठल्याही गोष्टीत रमत नसल्याने त्याचे वडील गौतम करजगी, आजी सुहासिनी करजगी व शिरीष करजगी हे त्याला या आठवणीतून काही काळासाठी का होईना बाहेर काढण्यासाठी नागपूरला घेऊन गेले असल्याची माहिती मिळाली.

आनंदवन पूर्वपदावर येत असले तरी कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद दिसला नाही. सारे काही संपल्यागत आनंदवनातील मंडळी आपापली कामे करताना दिसून आली. आनंदवनात नीरव शांतता बघायला मिळाली.