शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वरोऱ्यात गोळ्या झाडून इसमाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:27 IST

वरोरा : अवैध धंद्यात भागीदारी केली. पुढे यात वैमनस्य आल्याने या वादातून एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही ...

वरोरा : अवैध धंद्यात भागीदारी केली. पुढे यात वैमनस्य आल्याने या वादातून एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना येथील पंचायत समितीजवळ शनिवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.

आबिद शेख (वय ३५), रा. आझाद वाॅर्ड, वरोरा असे मृताचे नाव आहे. आबिद शेख याची एका व्यक्तीसोबत अवैध धंद्यात भागीदारी होती. त्यानंतर हे दोघेही वेगवेगळे धंदे करीत होते. यामध्ये दोघांमध्ये वाद झाले. या वैमनस्यातून आबिद शेख हा पंचायत समितीच्या परिसरात असताना त्याच्यावर गोळ्या झाडल्या. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याला गंभीर अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताच्या आप्तेष्टांनी रुग्णालयात एकच गर्दी केली. जोपर्यंत आरोपीला अटक करणार नाही, तोपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली आहे. यामुळे रुग्णालयात तणाव निर्माण झाला आहे.

बॉक्स

तीन दिवसांत दुसरी घटना

तीन दिवसांपूर्वी येथील महात्मा गांधी चौकात एका युवकावर चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. तीन दिवसांत पुन्हा भररस्त्यावर ही हत्येची घटना घडली. यामुळे वरोऱ्यातील कायदा व सुव्यवस्था अडचणीत आल्याचे दिसते.