शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चार रुग्णालयांच्या परवान्यात आढळली अनियमितता

By admin | Updated: March 24, 2017 00:53 IST

सांगली जिल्हयातील म्हैसाळ येथील प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करणारे रॅकेट उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर

गर्भलिंग निदान केंद्राविरोधात धडक मोहीम : पीसीएनडीटी कार्यशाळेचे उद्घाटन चंद्रपूर : सांगली जिल्हयातील म्हैसाळ येथील प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करणारे रॅकेट उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हयाची आरोग्य यंत्रणा, लिंग निदान केंद्र, गर्भपात केंद्र आणि खाजगी दवाखान्यांविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली. त्यामध्ये चार रुग्णालयाच्या परवान्याबाबत अनियमितता आढळून आली आहे. प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदानाबाबत जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे प्रसूती गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याबाबत (पीसीपीएनडीटी) एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.सांगली जिल्हयातील म्हैसाळ येथील घटनेनंतर जिल्ह्यात आरोग्य विभाग लक्ष ठेऊन असून जिल्हा व महानगर क्षेत्रात मोठया प्रमाणात तपास मोहीम सुरु आहे. गेल्या आठवड्याभरात करण्यात आलेल्या तपासणीमध्ये जिल्हयातील चार रुग्णालयांच्या परवान्याबाबत अनियमितता आढळून आली आहे. ग्रामीण भागात २१ रुग्णालयांची आणि चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात १६ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली आहे. नागरिकांनीही याबाबतीत सतर्कता बाळगून जिल्हा आरोग्य यंत्रणेला माहिती दयावी, असे आवाहन करण्यात आले.तसेच चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागाने प्रसूती गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (पीसीपीएनडीटी) यासंदर्भात एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी राष्ट्रीय आरोग्य मोहिमेच्या प्रमुख भाग्यश्री रंगारी यांनी उपस्थितांना या कायदयाची निर्मिती, आवश्यकता, प्रक्रिया आणि अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणीचे निरसन करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सादरीकरणाव्दारे व प्रश्नोत्तराने उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. हे प्रशिक्षण दिवसभर घेण्यात आले.कार्यशाळेच्या उदघाटन समारंभाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप मुंरबिकर, जिलहा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार, महानगर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अंजली आंबटकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आदिवासींमध्ये स्त्री-पुरूषांच्या कामाची विभागणी नाहीयावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र सिंग म्हणाले की, पाश्चिमात्य प्रगत देशात स्त्री-पुरुष असा भेद होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणचे स्त्री-पुरुष प्रमाण राखण्यासाठी कायदा करावा लागत नाही. भारतीय मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय समाजाने स्त्रीच्या कार्याची किंमत करण्याची, तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याची मानसिकता तयार करावी. मध्यमवर्गीय गृहिणी अनेक कामे सहजपणे करते. त्या कामाचे महत्त्व पुरुष कधीच लक्षात घेत नाही. आदिवासी समुदायात आणि प्रगत पाश्चिमात्य देशात स्त्री-पुरुषांमध्ये मात्र अशी विभागणी होत नाही. आमच्या घराघरातील महिलांना व त्यांच्या कार्याला गृहीत धरण्याची ही मानसिकता बदलविणे आवश्यक आहे. त्यानंतर आम्हाला अशा कायद्याला राबविण्यासाठी आग्रही राहण्याची गरजच पडणार नाही, असेही ते म्हणाले.