शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यामुळे इरई झाली गटारगंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

चंद्रपूर शहराची लोकसंख्या ५ लाखांच्या घरात पोहचली आहे. शहरातून इरई व झरपट या दोन नद्या वाहतात. झरपट नदीचे तर डोळ्यादेखत दूरवस्था होत असतानाही प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संघटना यापैकी कुणीही या ही दूरवस्था थांबवू शकले नाही. अनेक ठिकाणी या नदीचा चक्क नाला झाला आहे.

ठळक मुद्देआरोग्याला धोका : चंद्रपुरातील ८५ एमएलडी सांडपाणी इरई नदीत

रवी जवळे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहर झपाट्याने विकसित होत आहे. असे असले तरी येथील सांडपाण्याचे अद्यापही पाहिजे तसे नियोजन होत नसल्याने इरई नदी डोळ्यादेखत प्रदूषित होत आहे. चंद्रपूर शहराला दररोज १४० एमएलडी पाणी लागते. यातील ८५ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न करताच इरई नदीत जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला तर धोका उद्भवत आहेच; सोबत शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.चंद्रपूर शहराची लोकसंख्या ५ लाखांच्या घरात पोहचली आहे. शहरातून इरई व झरपट या दोन नद्या वाहतात. झरपट नदीचे तर डोळ्यादेखत दूरवस्था होत असतानाही प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संघटना यापैकी कुणीही या ही दूरवस्था थांबवू शकले नाही. अनेक ठिकाणी या नदीचा चक्क नाला झाला आहे. बाबुपेठ, महाकाली तसेच एमईएल अशा काही प्रभागातील सांडपाणी झरपट नदीत विसर्जित होते. याशिवाय या नदीकाठावर झोपडपट्टी परिसर अधिक असल्याने शौचालयाची घाणही याच नदीत जाते. त्यामुळे ही नदी प्रदूषित झाली आहे. येथील पाणी कधीही पिण्यायोग्य नाही. या पाण्याचा वापर पिकांसाठी होत असल्याने भाजीपाला पिकांवरही परिणाम होत आहे.इरई नदी वाहती आणि मोठी आहे. चंद्रपूरकरांना पिण्याचे पाणीही या नदीतून मिळते. चंद्रपूरची तहान भागविणारी नदी असतानाही या नदीकडे नागरिकांनी दुर्लक्ष करणे सुरू केले. कोळसा खननातून वेकोलिने टाकलेले महाकाय मातीचे ढिगारे व नागरिकांचे अतिक्रमण आणि कारखान्यांच्या रसायनमिश्रित पाण्यामुळे ही नदी अरुंद व दूषित झाली. विशेष म्हणजे, रहमतनगर, सिस्टर कॉलनी, नगिनाबाग परिसरात इरई नदीच्या पूरबुडित क्षेत्रातच नागरिकांनी घरे बांधून रहिवास सुरू केला आहे. अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी राहत आहेत. या वस्त्यातील सांडपाणी थेट इरई नदीच्या पात्रात जाते.मागील काही वर्षांपासून चंद्रपुरात मनपाकडून भूमिगत मलनिस्सारण योजनेचे काम सुरू आहे. मात्र अद्याप ही योजना फलद्रुप झालेली नाही. या योजनेतंर्गत २०१७ मध्ये रहमतनगर परिसरात २५ एमएलडी क्षमतेचे तर पठाणपुरा परिसरात ४५ एमएलडी क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र निर्माण करण्यात आले.या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र चंद्रपूर शहरात दररोज १४० एमएलडी पाणी वापरले जात असताना केवळ ७० एमएलडी सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जाते.ही माहिती महानगरपालिकेची असली तरी वास्तविक याहून कमी सांडपाण्यावर प्रक्रिया होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे सुमारे ७० टक्के सांडपाणी थेट इरई नदीत जाते. शहरी सांडपाण्यामध्ये मलमूत्र, आईल, ग्रिस, औषधे, किटकनाशके, डिटर्जंट, प्लास्टिक, तसेच कोली, बॅक्टरिया, विषाणू असतात.सांडपाण्यावर प्रक्रिया हाच उपायचंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो. सुमारे १४० एमएलडी सांडपाणी शहरातून बाहेर पडते. हे सांडपाणी थेट नदीत जात असल्याने मानवी आरोग्य व शेतपिकांवर विपरित परिणाम होत आहे. यासंदर्भात नागरिकांनीही अनेकदा तक्रारी केल्या. त्यामुळे या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे हा या समस्येला सोडविण्यासाठी एकमेव पर्याय असल्याचे पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पाणी शेतीसाठी अपायकारकशहरातील सांडपाणी प्रक्रिया न करताच इरई नदीत सोडले जाते. हे पाणी रहिवासी क्षेत्र व शेतीसाठी उपयोग केला जातो. यामुळे पिके खराब होत आहेत. भाजीपाला, फळे या पिकांना हे पाणी वापरल्याने व ते नागरिक खात असल्याने आरोग्यावर परिणाम होत आहे. दूषित पाणी जमिनीत मुरुन ते नदी, विहिरी, कुपनलिका आदी पेयजल स्रोतात जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे.कोळसा खाणीचेही पाणी नदीतजल प्रदूषण कायदा १९७४ कलम ३३ प्रमाणे कोळसा खाणीचे प्रदूषित पाणी नदीत किंवा नाल्यात सोडता येत नाही. परंतु वेकोलिने याकडे कधीच लक्ष दिले नाही. कोळसा खाणीतील प्रदूषित रसायनयुक्त पाणी थेट इरई नदीत सोडले जात आहे. याशिवाय चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील रसायनयुक्त पाणीदेखील काही प्रमाणात या नदीत जाते. त्यामुळे हे पाणी दूषित होत आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण