शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फळ पिकांसाठीही आता विम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे गतवर्षी पेरणीची संख्या कमालीने घटली होती. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात ५० टक्के पेरणीही झाली नाही. यंदा पावसाअभावी नव्हे तर पाऊस जास्त झाल्याने पेरणी झाली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये पेरणी केली आहे, अशा शेतकऱ्यांची पेरणीही पाण्याने वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा : कर्जदार शेतकऱ्यांना योजना सक्तीची

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : रब्बी हंगामात फळ पिकांसाठी राज्य शासनाने पीक विमा योजना सुरू केली आहे. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खरिप हंगामाला अवेळी पावसाचा जबर फटका बसला. रब्बीची पेरणीही खोळंबली आहे. त्यामुळे आता फळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून शासनाने फळ पीक विमा योजना सुरू केली आहे. यामुळे फळ पिकधारकांना विम्याचे सुरक्षित कवच लाभणार आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे गतवर्षी पेरणीची संख्या कमालीने घटली होती. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात ५० टक्के पेरणीही झाली नाही. यंदा पावसाअभावी नव्हे तर पाऊस जास्त झाल्याने पेरणी झाली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये पेरणी केली आहे, अशा शेतकऱ्यांची पेरणीही पाण्याने वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर शासनाकडून फळ पीक विमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मदत मिळविण्यासाठी पीक विम्याचा हप्ता भरावा लागणार आहे. द्राक्ष, केळी, आंबा, डाळींब, मोसंबी या फळपिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कर्जदार शेतकऱ्यांना योजना सक्तीची आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असणार आहे.दुसरीकडे ज्वारी, गहू, हरभरा, भुईमूग यासारख्या रब्बी पिकांची अजूनही पेरणी बहुतेक ठिकाणी झाली नाही. पाऊस कमी झाल्यानंतर ही पेरणी होणार आहे. मात्र, पेरणीस यंदा विलंब झाल्याने शेतकऱ्यांना पीक विमा योजनाही आवश्यक आहे. त्यामुळे रब्बी पीक विमा योजनेस सुरुवात करण्याची मागणी होत आहे.सरसकट हेक्टरी मदत द्यापीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी पिकांचे उंबरठा उत्पन्न मागील सात वर्षांपैकी सर्वाधिक उत्पन्नाच्या पाच वर्षांच्या सरासरी उत्पन्न गुणिले त्या पिकांचा जोखीम स्तर लक्षात घेण्याचा नियम असल्याने हा नियम शेतकऱ्यांना विमा संरक्षित रक्कम मिळवून देण्यास आडकाठी ठरत आहे. त्यामुळे या नियमासह अन्य जाचक अटी शिथिल करून अतिवृष्टी परिस्थितीमुळे सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा