शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या तक्रारीनंतर झाली चौकशी

By admin | Updated: January 10, 2016 01:18 IST

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र परिसरातील कंत्राटी सुरक्षा रक्षकांना विदर्भ प्रहार संघटनेने फसविल्याचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे.

चंद्रपूर: चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र परिसरातील कंत्राटी सुरक्षा रक्षकांना विदर्भ प्रहार संघटनेने फसविल्याचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. या संदर्भात कामगारांच्या तक्रारी आल्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळाचे सचिव व सरकारी कामगार अधिकारी यांनी चौकशी केली. विदर्भ प्रहार कामगार संघटनेने स्वत:च्या संघटनेच्या नावाचा उल्लेख असलेले नोंदणी फार्म छापून अनधिकृतरीत्या प्राईम सेक्युरिटी एजंसीकडे कार्यरत सुरक्षा रक्षकांची नोंदणी करून घेत असल्याचे त्यांनाही चौकशीत आढळून आले. विशेष म्हणजे, सदर नोंदणी फार्म निरीक्षकाद्वारे स्वीकारून संघटनेला मंडळाची पावती दिली जात असल्याचेही कामगार अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांना ही बाब गंभीर स्वरुपाची वाटल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर-गडचिरोली सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांना कळविले व जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे याबाबत तक्रार नोंदविली. विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या या प्रतापामुळे भविष्यात या सुरक्षा रक्षकांनी कामाची मागणी केल्यास मंडळासमोर अडचण निर्माण होऊ शकते व त्यांच्यामध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी आपल्या तक्रारीत व्यक्त केली आहे.विदर्भ प्रहार कामगार संघटनेने केवळ सुरक्षा रक्षकांचीच फसवणूक केली नाही तर त्यांनी शासनाचीही दिशाभूल केली असल्याची बाब कामगारंनी आपल्या तक्रारीतून मांडली असून कामगारांनी या संदर्भातील निवेदन कामगार मंत्री, पालकमंत्री, प्रधान सचिव कामगार मंत्रालय मुंबई, कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांनाही दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)