शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

जामनीत आले जखमी अस्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:00 IST

खडसंगी उपवन क्षेत्रात येणाऱ्या जामनी (पुनर्वसन) येथील शिवारात अस्वल भटकंती करीत गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावाशेजारी आली. गावातील एकाच्या घरातील टाक्यातील पाणी तिने पिले. काही नागरिकांनी अस्वलाला बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला असता अस्वलाने स्वत:च्या बचावासाठी एका झाडाजवळ आश्रय घेतला. ही माहिती गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

ठळक मुद्देबघ्यांची उसळली गर्दी : रेस्क्यू करून केले पिंजऱ्यात जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या खडसंगीपासून सहा किमी अंतरावरील जामनी (पुनर्वसन) येथे गावालगत गुरुवारी सकाळी ११ वाजता भटकलेल्या अस्वलाने जामनी गावालगत आश्रय घेतला. सदर अस्वल जखमी असून वनविभागाने तिला पिंजºयात जेरबंद केले आहे.खडसंगी उपवन क्षेत्रात येणाऱ्या जामनी (पुनर्वसन) येथील शिवारात अस्वल भटकंती करीत गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावाशेजारी आली. गावातील एकाच्या घरातील टाक्यातील पाणी तिने पिले. काही नागरिकांनी अस्वलाला बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला असता अस्वलाने स्वत:च्या बचावासाठी एका झाडाजवळ आश्रय घेतला. ही माहिती गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे, खडसंगी क्षेत्राचे आर. एच. नागदेवते, वनरक्षक एन. डी. मडावी, वनरक्षक डी.जे. मैद आदी कर्मचाºयांनी अस्वलाला रेस्क्यू करण्यासाठी नेट, पिंजरा लावला. दुपारी ४ वाजताच्या दरम्यान वन कर्मचाऱ्यांना या अस्वलाला पिंजºयात जेरबंद करण्यात यश आले. वैद्यकीय तपासणीकरिता अस्वलाला खडसंगी येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले आहे.सुब्बईत अस्वलाने दिला पिलांना जन्मराजुरा तालुक्यातील विरुर वन परिक्षेत्र अंतर्गत येणाºया सुब्बई नियत क्षेत्राच्या कक्ष क्रमांक १३७ मध्ये एका अस्वलाने पिल्लांना जन्म दिला. याची माहिती बुधवारीच गावकऱ्यांनी वन विभागाला दिली. मात्र वन अधिकाऱ्यांनी याची अजूनही दखल घेतली नाही. सध्या नागरिक दहशतीत आहेत. सुब्बई येथील इंदिरानगर वस्तीला लागूनच असलेल्या झुडपात अस्वलाने दोन पिलांना जन्म दिला. अस्वल आणि तिचे पिल्ले सुखरुप आहे. मात्र वृत्त लिहिपर्यंत वनविभागाचे अधिकारी अजूनही त्या ठिकाणी आलेले नाही. या अस्वलामुळे नागरिकांना धोका तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीव