भद्रावतीत सुगंंधित तंबाखूच्या साठ्यावर धाड

By Admin | Updated: December 27, 2015 01:20 IST2015-12-27T01:20:37+5:302015-12-27T01:20:37+5:30

गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका पथकाने सूर्यमंदिर वार्ड लुंबिनीनगर येथे सुगंधित तंबाखूच्या साठ्यावर धाड टाकली.

Inhalation of smelly toasted tobacco | भद्रावतीत सुगंंधित तंबाखूच्या साठ्यावर धाड

भद्रावतीत सुगंंधित तंबाखूच्या साठ्यावर धाड

आरोपी अटकेत : चार लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त
भद्रावती : गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका पथकाने सूर्यमंदिर वार्ड लुंबिनीनगर येथे सुगंधित तंबाखूच्या साठ्यावर धाड टाकली. यात ३ लाख ९७ हजार ४०० रुपयांच्या मुद्देमालासह एका आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारला दुपारी ३ वाजता करण्यात आली.
सूर्यमंदिर वॉर्ड, लुंबिनीनगर येथे आरोपी दीपक डाखराम निखारे (३२) हा स्वत:च्या घरी लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखू अवैधरीत्या साठवून त्याची राजरोसपणे विक्री करीत असल्याची गुप्त माहिती चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली.
माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांच्या पथकाने सापळा रचून दुपारी ३ वाजताच्या सुमारास धाड घातली.
धाडीत सुगंधित माजा ५०० ग्रॅम, २०० ग्रॅम, बागबान, बाबा, हिरो, जनम आदी कंपनीचा ३ लाख ९७ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला.
ही कारवाई पी.आय. कंकाळे यांच्या मार्गदर्शनात उईके, सहायक उपनिरीक्षक दौलत चालखुरे, जाधव, पोलीस हवालदार पद्माकर भोयर, दीपक देशपांडे, संदीप बुरडकर, अमजद खा, गणेश भोयर, चालक ढाकणे या पथकाने केली. (शहर प्रतिनिधी)
पोलिसांची भूमिका संशयास्पद
या प्रकरणात सापडलेला आरोपी याला यापूर्वी अशाच प्रकरणात भद्रावती पोलिसांनी अटक केली होती. शहरात सुगंधित तंबाखू विकणारे त्याच्यासह अन्य चार व्यापारी आहेत. परंतु त्यांच्यावर अजूनपर्यंत पोलिसांनी कारवाई केली नाही. पकडण्यात आलेला आरोपी दीपक निखारे याच्या माध्यमातून पोलिसांनी इतर तीन व्यापाऱ्यांशी संगणमत करून महिन्याकाठी ७० हजार रुपयांचा हप्ता बांधल्याची चर्चा खुद्द काही पोलिसात दबक्या आवाजात सुरू आहे. आजची कारवाई चंद्रपूर गुन्हे अन्वेषण शाखेने केल्याने या चर्चेला पुष्टी मिळते.

Web Title: Inhalation of smelly toasted tobacco