शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

नव्या यादीत ब्रह्मपुरी, नागभीडचाही समावेश करा

By admin | Updated: February 22, 2015 01:03 IST

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना पुन्हा नक्षलग्रस्ताच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना पुन्हा नक्षलग्रस्ताच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. ब्रह्मपुरी व नागभीड तालुक्यात नक्षल्यांची पत्रके आढळून आली. नक्षल्यांवर कारवाईदेखील झाली. तरीही हे तालुके नक्षलग्रस्त घोषित केले जात नसल्याने या तालुक्यांवर शासनस्तरावर दुर्लक्ष होत आहे. नव्या यादीत या दोन्ही तालुक्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांची आहे.राज्यातील नक्षलग्रस्त भाग घोषित करण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात आढावा घेतला जातो. या आढाव्यानंतर आवश्यकतेनुसार नक्षलग्रस्त भाग वगळायचा की ठेवायचा हे ठरविले जाते. सन २०१२ मध्ये वडसा रोडवरील आमले बी.एड कॉलेजवळ नक्षली पत्रके रस्त्याने फेकली होती. तसेच नागभीड तालुक्यात तळोधी (बा.) येथे बसस्थानकावरुन पुनवटकर नावाच्या नक्षलवाद्यास पकडले होते. या दोन्ही घटना तालुक्यासाठी मोठ्या असूनही ही दोन्ही तालुके नक्षलग्रस्त घोषित का केली जात नाही, असा प्रश्न नागरिकांसह कर्मचारी करीत आहेत. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये नक्षली कारवाया अजूनपर्यंत आढळून आल्या नाही. तरी ते तालुके नक्षलग्रस्त म्हणून घोषित झाले होते व पुन्हा हालचाली त्याच तालुक्यांच्या बाबतीत होताना दिसत आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी व नागभीड तालुक्यांवर हा अन्याय होत असल्याचे बोलले जात आहे. ब्रह्मपुरी तालुका हा आरमोरीला लागून असल्याने नक्षल कारवाया होत असतात. नव्याने तयार होणाऱ्या नक्षलग्रस्तांच्या यादीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रह्मपुरी व नागभीड तालुक्यांचा समावेश करावा व यापूर्वी या तालुक्यांवर झालेला अन्याय दूर करावा, अशी मागणी दोन्ही तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)