शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

जिवती तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न तातडीने निकाली काढणार

By admin | Updated: February 22, 2015 01:01 IST

गेल्या अनेक वर्षापूर्वी मराठवाड्यातून स्थलांतरित होऊन जिवती तालुक्यात स्थायी झालेल्या नागरिकांना जमीन आहे; पण मालकी हक्क नाही.

जिवती : गेल्या अनेक वर्षापूर्वी मराठवाड्यातून स्थलांतरित होऊन जिवती तालुक्यात स्थायी झालेल्या नागरिकांना जमीन आहे; पण मालकी हक्क नाही. वास्तव्य आहे पण तीन पिढीचा पुरावा नाही, यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळग्रस्त निधीपासून वंचित राहावे लागत आहे तर विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या कागदपत्राअभावी शासकीय नोकरीत, स्पर्धेत भाग घेता येत नाही. अशा अनेक समस्याला तोंड देणाऱ्या समाजाचे प्रश्न तातडीने निकाली काढू, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री संजय राठोड यांनी जिवती येथे काल शुक्रवारी आयोजित सेवालाल महाराज जयंती कार्यक्रमात बोलताना दिली.यावेळी ते पुढे म्हणाले, दिवसेंदिवस निसर्ग दगा असल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. यावर शेतकऱ्यांनी खचून न जाता आपल्या मुलाबाळांना शिक्षणाकडे वळवावे. कारण शिक्षणामुळेच आपला विस्कटलेला समाज संघटित होईल व आपल्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करेल. तेव्हाच आपल्या तांड्या-तांड्यात विस्कटलेल्या समाज घटकाचा विकास होईल. गेल्या अनेक वर्षापासून जमिनीचा मालकी हक्क व जातीचा दाखला, नॉनक्रिमीलेअरसाठी लावलेली जाचक अट लवकरच दूर व्हावी यासाठी त्यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊनच ते जिवतीतील सेवालाल महाराज जयंतीला उपस्थित झाले होते.सेवालाल महाराजांची २७६ वी जयंती जिवती येथील जुन्या ग्रामपंचायत समोरील रंगमंचकावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळचे नवलकुमार राठोड, जवाहर राठोड, बी.जी. राठोड उपस्थित होते. सेवालाल महाराजांच्या जयंतीची सुरुवात पायदळ व मोटार सायकल रॅली काढून करण्यात आली. त्यात आपली परंपरेने चालत आलेली गिते सादर करून समाजबांधवांनी लोकांची मने जिंकली. कार्यक्रमाप्रसंगी बालाजी हायस्कुल शाळेतील विद्यार्थिनींनी बंजारा गीतावर सामूहिक नृत्य सादर करून संस्कृतीचे दर्शन घडविले. सायंकाळी शाहीर दौलत राठोड यांनी वेगवेगळ्या भाषेत समाज प्रबोधनपर गिते गायली. प्रास्ताविक जी.व्ही. राठोड व आपल्या समाजाच्या व्यथा अमर राठोड यांनी मांडल्या. संचालन राजेश राठोड यांनी तर आभार गजानन राठोड यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)