शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आसापूर शिवारात अवैध गौण उत्खनन

By admin | Updated: December 22, 2014 22:43 IST

तालुका तहसील कार्यालयापासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर आसापूर शेतशिवाराला लागूनच गिट्टीचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भरदिवसा उत्खनन करून त्याची वाहनांनी वाहतूक होत असते.

जिवती : तालुका तहसील कार्यालयापासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर आसापूर शेतशिवाराला लागूनच गिट्टीचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भरदिवसा उत्खनन करून त्याची वाहनांनी वाहतूक होत असते. पण महसूल अधिकारी, वनविभागाचे कर्मचारी याकडे हेतुपुरस्सर कानाडोळा करत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, सदर गिट्टी व दगडाचे उत्खनन ज्याठिकाणी सुरू आहे, ते ठिकाण रस्त्याच्या कडेलाच पंधरा ते वीस मीटर अंतरावर लागून आहे. याच रस्त्यावरुन महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी दररोज तहसील कार्यालयात ये- जा करतात. पण त्यांना हा अवैधरित्या चालत असलेला प्रकार कधीच दिसला नाही.जिवती तालुक्यात कुठेही गौण उत्खननासाठी परवाना मिळणार नाही, असे सक्त आदेश असताना तसेच वनविभाग आणि महसूल विभागाची नेमकी जागा कोणती हे निश्चित होणार नाही तोपर्यंत परवाना मिळणार नाही, असे शासकीय निर्देश आहेत. असे असताना तालुक्यात सर्रासपणे अवैध उत्खनन सुरू कसे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सहाजिकच अधिकाऱ्यांकडे अंगुलीनिर्देश केले जात आहे. विनापरवान्याने गाड्या भरुन जातात, शासनाचा महसूल बुडतो, हा गंभीर प्रकार असतानाही यासंदर्भात कारवाई मात्र शुन्य आहे.नगराळा तलाठी साजा अंतर्गत आसापूर शेतशिवाराला लागून हे अवैध उत्खनन गेल्या वर्षभरापासून सुरू असून उत्खननामुळे याठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. प्रस्तूत प्रतिनिधीने याठिकाणी भेट दिली असता हे उत्खनन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या अगदी मागच्या बाजूला सुरू असल्याचे दिसून आले. शाळेच्या जवळच मोठमोठे खड्डे पडल्याने भविष्यात हे खड्डे विद्यार्थ्यांसाठी धोक्याचे ठरू शकतात, अशा प्रतिक्रिया या शाळेच्या शिक्षकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या आहेत. केवळ याच ठिकाणी नाही तर हा प्रकार संपूर्ण तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू आहे. वनविभागाच्या जागेतूनही हा प्रकार होत असताना त्यांच्याकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्याच्या विकासाची भाषा करणारे महसूल अधिकारी बंदी असलेल्या परिसरातच अवैध उत्खनन कसे काय होऊ देतात, हा प्रश्न त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. यात शासनाचाही लाखोंचा महसूल बुडत आहे. यात अधिकाऱ्यांचे हातही ओले होत असल्याची परिसरात चर्चा आहे. (शहर प्रतिनिधी)