शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दिंदोडा प्रकल्पासाठी अवैध उत्खनन

By admin | Updated: May 9, 2015 01:04 IST

तालुक्यातील दिंदोडा गावाच्या शिवारातील वर्धा नदीमध्ये दिंदोडा बॅरेज प्रकल्पाचे काम सुरू आहे.

वरोरा : तालुक्यातील दिंदोडा गावाच्या शिवारातील वर्धा नदीमध्ये दिंदोडा बॅरेज प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाकरीता वर्धा नदीतून गौण खणीज मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन करण्यात येत आहे. याची माहिती मिळताच शुक्रवारी महसुल विभागाने कारवाई करून दोन हायवा ट्रक जप्त केले. दिंदोडा बॅरेज प्रकल्प वर्धा नदीच्या संगमावर वरोरा तालुक्यातील दिंदोडा गावाच्या शिवारात होणार आहे. या प्रकल्पाकरीता काही वर्षांपूर्वी चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील जमिनी अत्यल्प मोबदला देवून अधिग्रहीत केल्या होत्या. प्रकल्पात जमिनी अत्यल्प किमतीने अधिग्रहीत केल्याने काही शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिल्यानंतरही शासनाने वाढीव मोबदला दिला नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या कार्यालयातील साहित्य जप्त करण्यात आले होते. त्यानंतर प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली प्रशासनाने करीत काही दिवसापूर्वी जाहीर सुनावणी घेण्यात आली. त्यात प्रकल्पग्रस्तांनी वाढीव मोबदला दिल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरू करू नका तसेच प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्या, आदी आग्रही मागण्या केल्या. या मागण्या शासन दरबारी पोहचवून यानंतर शासन काय निर्णय घेते, त्यानंतर बघू अशी भूमिका जनसुनावणीच्या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी घेतली. जनसुनावणी बाबत प्रकल्पग्रस्तांना काही कळविण्याच्या आतच दिंदोडा गावानजीक प्रकल्पाचे काम सुरू करण्याकरिता साहित्य काही दिवसापूर्वी आणण्यात आले. त्यानंतर प्रकल्पाचे काम करण्याकरिता खोदकाम सुरू करण्यात आले. रेतीचा उपसा करून ढिग तसेच मुरुम व मातीचे ढिगारे नदीतून काढून जमा करण्यात आले. याबाबतची माहिती वरोरा महसुल विभागास मिळताच त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली व त्या कामावरील एमएच २५ यु १६९ व एमएच २५ बी ९९८० या क्रमांकाचे दोन हायवा ट्रक महसुल विभागाने जप्त केले. जप्त ट्रक तहसील कार्यालय वरोरा येथे ठेवण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत प्रकल्पाचे काम बंद करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. (तालुका प्रतिनिधी)