शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अवैध शिकवण्यांकडे शिक्षणाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By admin | Updated: January 24, 2015 22:51 IST

अवैध शिकवणी वर्गांविरूद्ध शिक्षणाधिकाऱ्यांनी मधल्या काळात मोहीम उघडली असली तरी अलिकडे ती थंडावली. एवढेच नाही तर, नेहरू कनिष्ठ विद्यालयातील शिक्षकांना शिकवणी वर्ग घेताना

चंद्रपूर : अवैध शिकवणी वर्गांविरूद्ध शिक्षणाधिकाऱ्यांनी मधल्या काळात मोहीम उघडली असली तरी अलिकडे ती थंडावली. एवढेच नाही तर, नेहरू कनिष्ठ विद्यालयातील शिक्षकांना शिकवणी वर्ग घेताना रंगेहात पकडूनही कारवाई झालीच नाही. परिणामत: अवैध शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षक-प्राध्यापकांचे मनोधैर्य वाढले असून त्याचा फटका मात्र सर्वसामान्य गरिब विद्यार्थ्यांना बसत आहे.शाळा-महाविद्यालय अथवा शैक्षणिक संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या शिक्षक-प्राध्यापकांना खाजगी शिकवणी वर्ग घेता येत नाहीत. असे असतानाही संस्थाचालक आणि शिक्षकांच्या मधूर सबंधातून चंद्रपूर शहरात अवैध शिकवणी वर्गांचे पीक आले आहे. अलिकडेच शिक्षणाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या एका निनावी तक्रारीत चंद्रपुरातील भवानजीभाई चव्हाण हायस्कूलमधील शिक्षक-प्राध्यापकांच्या अवैध शिकवणी वर्गांचा हिशेब मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या अवैध वर्गाला व्यवस्थापनाचेही पाठबळ असून शिकवणीच्या शुल्कातील ठराविक हिस्सा व्यवस्थापनालाही मिळतो, अशी तक्रार आहे. विज्ञान विषयाचे दोन वर्ग असून १४० विद्यार्थी शिक्षण घेतात. सी.बी. टोंगे, के.एन. विधाते, प्रा.धानोरकर आणि प्रा.निब्रड हे चारही शिक्षक आणि विनाअनुदानित तुकड्यांवरील शिक्षक पालकांना बोलावून हमीपत्र लिहून घेतात. शिकवणी वर्ग शाळेतच भरवून त्या बदल्यात प्रत्येक विद्यार्थ्यांकडून १० हजार याप्रमाणे रक्कम गोळा केली जाते. त्यातील प्रति विद्यार्थ्याप्रमाणे ठराविक रक्कम व्यवस्थापनाला मिळते. या शिवाय प्रा. टोंगे स्वत:च्या घरी सकाळी आणि सायंकाळी चार बॅचेसमध्ये शिकवणी घेतात. २५ हजार रूपये कोर्स असा दर आहे. एका बॅचमध्ये १५ ते २० विद्यार्थी या हिशेबाने वर्षाचे लक्षावधी रूपये ही प्राध्यापक मंडळी अवैध मार्गाने कमावतात. याच शाळेतील निब्रड नावाचे शिक्षक वरोरा येथे आपल्या घरी शिकवणी घेतात. अन्य शाळांमध्येही असाच प्रकार थोड्याअधिक फरकाने सुरू आहे. मुलांना शिकवणीसाठी चार ठिकाणी जावे लागू नये, अभ्यासाच्या धावपळ नको या हेतूने एकाच छताखाली असलेल्या या शिकवणींच्या सुविधेचा पालक नाईलाजाने स्विकार करतात. (जिल्हा प्रतिनिधी)